नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | देशान्तर्गत बाजारात सोन्या-चांदीचे दर वारंवार बदलताना दिसत असतात. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासुन सोन्याच्या दरात (Gold Price Today) घट होताना दिसत आहे. याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली आहे. केवळ दोन दिवसामध्ये सोन्याच्या भावात 1,700 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर, चांदीच्या किंमतीत (Silver) 4,000 रूपयाची घट झाली आहे. एमसीएक्स (MCX) नुसार शुक्रवारी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1 हजार आणि चांदीचा भाव 2,000 रूपयांनी घट झालेत. तसेच सोमवारी सोने 700 तर चांदी 2,250 रुपयांनी घट झाली आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
सोन्याचा नवा भाव – (Gold Price)
दरम्यान, मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबर वायद्यानुसार सोने 170 रुपयांनी वाढून 46,056 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव (Gold Price) 1,730.47 डॉलर प्रति औंस होता. तर, डॉलर निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्चांकावर होता, म्हणुन अन्य चलनांच्या तुलनेत सोने अधिक महाग झाल्याचे दिसले आहे.
चांदीचा नवा भाव – (Silver Price)
मंगळवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) वर सप्टेंबर वायदा चांदीचा भाव (Silver Price) 525 रुपयांनी वाढून 63,162 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 23.43 डॉलर प्रति औंस होता. गेल्या सत्रात चांदीचा भाव (Silver Price) 8 महिन्यांच्या नीचांकावर घसरला होता.
दरम्यान, जागतिक बाजारात सोन्याची किंमत (Gold Price) अनेक महिन्यांतील सर्वात खालच्या
पातळीवर आली. फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षेपुढे अमेरिकन बाँड उत्पन्न आणि मागील आठवड्यात
मजबूत अमेरिकन नोकऱ्यांच्या आकडेवारी नुसार प्रोत्साहन देण्यावर डॉलर मजबूत झाला. SPDR
Gold Trust जगातील सर्वात मोठा सोने समर्थित एक्सचेंज-ट्रेडेड फंडाची होल्डिंग्स 0.2 टक्क्यांनी
घसरून सोमवारी 1,023.54 टनावर आली, की, ज्यावेळी शुक्रवारी 1,025.28 टन इतकी होती.
Web Title : Gold Price Today | gold silver price today gold down by rs 1700 in just two days check for new rates now
Pune Crime | शिरुरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेल चालक, मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका
Jobs | देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, उघडल्या जाणार अनेक शाखा