IMPIMP

Jobs | देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, उघडल्या जाणार अनेक शाखा

by nagesh
HDFC Bank Hike MCLR | hdfc bank hike mclr on loan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Jobs | देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक HDFC ने MSME सेक्टरवर लक्ष देण्यासाठी आणि या क्षेत्रात आपले स्थान आणखी बळकट करण्यासाठी, 500 नवीन रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त (Jobs) करण्याचा निर्णय घेतला आहे. HDFC बँकेने 575 डिस्ट्रिकमध्ये आपल्या MSME शाखांच्या सेवा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

575 जिल्ह्यांमध्ये एमएसएमई शाखा

आतापर्यंत 545 जिल्ह्यांमध्ये बँकेच्या MSME व्हर्टिकल शाखा संचालित होत होत्या, ज्या या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 575 किंवा त्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये विस्तारित केल्या जातील.

 

एमएसएमई कर्मचार्‍यांची संख्या वाढून 2,500 होईल

या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीनंतर बँकेच्या MSME शाखांमध्ये एकुण कर्मचार्‍यांची संख्या वाढून 2,500 होईल.  जूनच्या अखेरपर्यंत बँकेच्या एकुण कर्मचार्‍यांची संख्या 1.23 लाख होती.

बिझनेस बँकिंग आणि हेल्थकेयर फायनान्सचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष सुमंत रामपाल यांनी सोमवारी
आपल्या वक्तव्यात म्हटले की, आम्ही आमच्या एमएसएमई शाखांचा विस्तार 545 जिल्ह्यांवरून वाढवून 575 जिल्ह्यांपर्यंत करत आहोत.

या वर्षात 500पेक्षा जास्त नियुक्त्या करणार

शाखांच्या या विस्तारामुळे चालू आर्थिक वर्षात एमएसएमई शाखांमध्ये 500पेक्षा जास्त लोकांची नियुक्ती
केली जाईल. यामुळे या शाखांमध्ये एकुण कर्मचार्‍यांची संख्या 2,500 वरून वाढून आणखी जास्त होईल.

महामारीनंतर जास्त लक्ष केंद्रीत केले

रामपाल म्हणाले, बँक मागील दोन वर्षापासून एमएसएमई क्षेत्रवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आणि
महामारीच्या नंतर जेव्हा सरकारने छोट्या व्यवसायांना आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेसह संकटाला तोंड देण्यासाठी मदत करण्यासाठी उपाय करण्यास सुरूवात केली तेव्हापासून आम्ही यावर आणखी लक्ष देण्यास सुरूवात केली होती.

545 शाखांमध्ये स्पेशल MSME काऊंटर

आमच्या टीमने शाखांच्या विस्तारासाठी जिल्ह्यांची निवड केली आहे. मात्र, या जिल्ह्यांमध्ये बँकेच्या नियमित
शाखा सुद्धा आहेत परंतु एमएसएमई क्षेत्रावर वेगळ्याप्रकारे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या HDFC बँक 630 शाखांचे संचालन करत आहे, ज्यांच्यात 545 शाखांमध्ये स्पेशल MSME काऊंटरची सुविधा उपलब्ध आहे.

 

Web Title : Jobs | 15 hdfc bank will recurite 500 relationship managers aim to expand his msme brances

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील कचरा व्यवस्थापन पालिकेपुढील ‘आव्हान’; ‘पर्याय’ सुचविण्याचे ‘आवाहन’

Pune Crime | कर्वेनगरमधील सराईत गुंडाला केले तडीपार

Pune Crime | पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर चाकू हल्ला; विश्रांतवाडी परिसरात खळबळ

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts