IMPIMP

Indian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ! ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर

by nagesh
Petrol Price

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ग्राहकांसाठी आता भारतातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलने (Indian Oil) एक खास योजना आणली आहे. नेमकी काय आहे योजना हे जाणून घ्या. ग्राहकांसाठी 2 कोटी रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. या योजनेनुसार कंपनीच्या पेट्रोल पंपांवर (Petrol pump) ग्राहकांनी पेट्रोल भरून या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. या स्पर्धेतून चक्क 2 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. डिझेल भरा, बक्षिसं जिंका या योजनेचा लाभ फायदा 18 वर्षांपेक्षा पुढील व्यक्तीला घेता येतो. याबाबत माहिती इंडियन ऑईलने (Indian Oil) ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

नेमकी ऑफर काय?

‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्राहकाला इंडियन ऑईलच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर जाऊन 25 लिटर अथवा त्याहून अधिक लिटर डिझेल आपल्या वाहनात भरावं लागणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकाने 25 लिटर डिझेल तुम्ही एकावेळीच भरणे आवश्यक आहे. तसेच त्याचं एकच बिल तयार झालं पाहिजे.

 

 

कुठे कराल एसएमएस?

25 लिटर डिझेल भरल्यावर तुम्हाला Single Printed Bill मिळणार आहे. त्यावरचा बिल नंबर आणि डिलर कोड ग्राहकाला 7799033333 नंबरवर SMS करायचा आहे.

– SMS मध्ये प्रथम डिलर कोड टाइप करा स्पेस द्या

– नंतर बिल नंबर टाका त्यानंतर स्पेस द्या.

– किती लिटर डिझेल भरलं ते लिहा आणि मग 7799033333 नंबरवर कोड पाठवून द्या.

– हा SMS पाठवल्यावर ग्राहकाला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

दरम्यान, एकाच पेट्रोल पंपावरून 2 वेळा 25 लिटर डिझेल भरलं तर अथवा 2 पंपांवरून (Petrol pump)
2 वेळा डिझेल भरलं तरीही ग्राहकाला प्रत्येक बिल वेगळंवेगळं घेऊन त्याचा SMS पाठवता येईल. अर्थात
ग्राहकाला अनेक एंट्रीज पाठवता येणार आहे. तर, एका मोबाईल क्रमांकावरून तुम्ही 2 बिलं पाठवू शकणार आहे.

 

 

‘ही’ आहे ऑफरची शेवटची तारीख –

इंडियन ऑईलची (Indian Oil) ही ऑफर 31 जुलै 2021 रात्री 12 वाजेपर्यंत लागू आहे. कंपनीने याचे
नियमही स्पष्ट केले आहेत. जर ग्राहकानी कुठल्याही कारणास्तव बिल नंबर SMS केला नाही तर त्याला
जबाबदार कंपनी नाही. त्याचबरोबर प्रिंटेड बिल नंबर पाठवल्यानंतर ते हरवलं अथवा डिजिटल बिल पाठवल्यावर ते डिलिट झालं तर कंपनी ग्राहकाला बक्षिस मिळालं तरी देखील देऊ शकणार नाही. म्हणून प्रिंटेड बिल आणि डिजिटल बिल दोन्हीही सांभाळून ठेवा. असं सांगितलं आहे.

 

 

कोणाला मिळणार लाभ?

या स्पर्धेत केवळ जे राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपांवर
(Petrol pump) पेट्रोल खरेदी करतील. कमीतकमी 25 लिटर ते अधिकाधिक 2500 लिटर
डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना बिल नंबर SMS करून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
एक्सट्रामली (XTRAMILE ) डिझेल खरेदी करणारेही या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत.

 

Web Title : Indian Oil | fill diesel from any petrol pump of india oil and win upto 2 crore cash back

 

हे देखील वाचा :

Indian players । भारतीय संघाचे खेळाडू यजुर्वेंद्र चहल, कृष्णप्पा गौथम यांना करोनाची लागण

Wakad Crime | ‘तुला काय करायचे ते कर, माझ्याकडे रोज 50 पोलीस येतात, महिला पोलिसासोबत हुज्जत’

Mumbai Crime | बर्थडे पार्टीसाठी बोलावलं अन् दिलं गुंगीचं औषध, मुंबईमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर ‘रेप’

 

Related Posts