IMPIMP

Bhandara News | दुर्देवी ! गाय वाचवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

by nagesh
Bhandara News | young man drowns lake bhandara pavani taluka

भंडारा : सरकारसत्ता ऑनलाइन  Bhandara News | पवनी तालुक्यातील वाही या गावातील एक दुर्देवी घटना समोर आली आहे. घरची गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू (Young man drowns in lake) झाल्याची दुर्देवी घटना घडली. घरची गुरे चारण्यासाठी गेलेला तरुण घरी परतत असताना एक गाय तलावाच्या पाण्यात गेली. तिला वाचवण्यासाठी गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणाचा प्राण (Died) गेला आहे. रुपेश उर्फ वैभव रघुनाथ शहारे (वय, 17) असे त्या मृत तरुणाचे (Bhandara News) नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, रुपेश शहारे (Rupesh Shahare) शुक्रवारी दुपारी घराची जनावरे घेऊन गाव तलावाकडे चाराण्यासाठी गेला होता.
शुक्रवारी सायंकाळी घराकडे परत येत असताना एक गाय तलावाच्या पाण्यात गेली. तिला काढण्यासाठी रुपेश तलावात उतरला. मात्र खोल पाण्याचा
अंदाज आला नाही आणि रुपेश व गाय दोघेही पाण्यात बुडाले. रुपेश हा जनावरे घेऊन घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली.

 

गावकऱ्यांच्या मदतीने तलावाकडे शोधाशोध केली असता तलावात गायीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यामुळे रुपेशही तलावात बुडाला असावा
अशी शंका व्यक्त करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत तलावात शोध घेण्यात आला. मात्र कोणताही थांगपत्ता लागला नाही. शनिवारी सकाळी पुन्हा
गावकऱ्यांनी निष्टी व वाही येथील ढिवर बांधवाच्या मदतीने तलावात शोधाशोध सुरू केली. तेव्हा सकाळी 7.30 वाजताचा त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पवनी पोलिस ठाण्यात (Pawani Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title : Bhandara News | young man drowns lake bhandara pavani taluka

 

हे देखील वाचा :

APL Apollo Tubes | 480 रुपयांचा शेयर झाला 1880 रुपयांचा, 1 वर्षात या शेयने दिला 260% चा रिटर्न, तुम्ही करू शकता का यामध्ये गुंतवणूक?

Crude Palm Oil | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; मोदी सरकारने केली आयात शुल्कात मोठी कपात

Kolhapur News | विनाअपाॅईंटेमेंट नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा मार्ग खुला; कलेक्टर रेखावर यांचा नवा प्रयोग

 

Related Posts