IMPIMP

Crude Palm Oil | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; मोदी सरकारने केली आयात शुल्कात मोठी कपात

by nagesh
Edible Oil Rate | prices edible oils fall know how cheap mustard oil and other know details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Crude Palm Oil | खाद्यातेलाच्या किंमती (Edible oil prices) मागील अनेक महिन्यापासुन गगनाला भिडल्या आहेत. यामुळे नागरिकांची मोठी तांराबळ होत आहे. तेलाच्या किंमती (Crude Palm Oil) वाढल्याने अनेक सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहे. आता सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता खाद्यतेलाच्या वाढत्या किॆमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आयात शुल्क तब्बल 5.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या सणासुदीच्या काळात देशातील नागरिकांना एक सुखद बातमी आहे.

 

मोदी सरकारकडून मागील काही महिन्यामध्ये देखील खाद्य तेलावरील आयात शुल्कात घट करण्यात आली होती. गतवर्षी खाद्य तेलाच्या दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढले आहेत. यावरुन आता केद्र सरकारने (Central Government) खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, खाद्य तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तेलाची साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील केंद्र सरकारने दिला आहे. भारतातील सर्व खाद्य तेल उत्पादक कंपन्या आणि होलसेल व्यापाऱ्यांकडून तेलाची साठेबाजी (Hoarding) केली जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रातील राज्य सरकारांना दिल्या गेल्या आहेत.

 

30 सप्टेंबरपर्यंत तेलावरील आयात शुल्क…

कच्च्या पाम तेलावरील (Crude Palm Oil- CPO) आयात शुल्क 30.25 टक्क्यांवरुन 24.7 टक्के

रिफाइंड पाम तेलावरील (Refined palm oil) आयात शुल्क 41.25 टक्क्यांवरुन 35.75 टक्के

रिफाइंड सोया तेलावरील (Refined soybean oil) आयात शुल्क 30.45 टक्क्यांवरून 37.5 टक्के

सनफ्लावर तेलावरील (Sunflower oil) आयात शुल्क 30.45 टक्क्यांवरून 37.5 टक्के

 

Web Title : Crude Palm Oil | modi government has reduced import duty crude palm oil

 

हे देखील वाचा :

Kolhapur News | विनाअपाॅईंटेमेंट नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा मार्ग खुला; कलेक्टर रेखावर यांचा नवा प्रयोग

Pune Court | गुन्हा दाखल करण्याच्या ‘त्या’ आदेशाला सत्र न्यायालयाची स्थगिती; उस्मान तांबोळी म्हणाले – ‘ रौनक ओसवाल यांच्यावर 5 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करणार’

Crime News | खासगी रुग्णालयात कंपाऊंडरनेच केला महिला रुग्णावर अत्याचाराचा प्रयत्न

 

Related Posts