IMPIMP

APL Apollo Tubes | 480 रुपयांचा शेयर झाला 1880 रुपयांचा, 1 वर्षात या शेयने दिला 260% चा रिटर्न, तुम्ही करू शकता का यामध्ये गुंतवणूक?

by nagesh
earing opportunity this multibagger stock give 260 percent return in last 1 year

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील एक वर्षात APL Apollo Tubes च्या शेयर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. 2021 पासून आतापर्यंत याचा रिटर्न 103% होता. सप्टेंबर 2020 मध्ये APL Apollo Tubes चे शेयर 480 रुपयांवर ट्रेड करत होते जे शुक्रवार 9 सप्टेंबरला 2.19% च्या वर 1880 रुपयांवर बंद झाले आहेत.

APL Apollo Tubes स्ट्रक्चरल स्टील ट्यूब बनवणारी देशातील मोठी कंपनी आहे. ती अनेक प्रकारचे प्रॉडक्ट बनवते. ज्यामध्ये प्री-गॅल्व्हनाईज्ड ट्यूब्ज, स्ट्रक्चरल स्टील ट्यूब्ज, गॅल्व्हनाइज्ड ट्यूब्ज, MS ब्लॅक पाईप आणि हॉलो सेक्शन्स बनवते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जाणून घ्या काय आहे एक्सपर्टचा सल्ला

डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने APL Apollo Tubes च्या कव्हरेजची सुरुवात यास Buy रेटिंगसह केली आहे. मोतीलाल ओसवालचे म्हणणे आहे की, आगामी दिवसात हा मल्टी बॅगर स्टॉक आणखी मजबूत रिटर्न देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की प्रॉडक्ट सेगमेंटमध्ये डिमांड वाढल्याने कंपनीचा नफा वाढेल.

ब्रोकरेज फर्मने APL Apollo Tubes चे शेयर खरेदी करण्याचा सल्ला देत त्याची टार्गेट प्राईस 2065 रुपए प्रति शेयर ठरवली आहे. शुक्रवार 9 सप्टेंबरला 2.19% च्या वर 1880 रुपयांवर तो बंद झाला होता. आपली लीडरशिप पोझीशन, कमी खर्च, स्ट्रक्चरल ट्यूब बिझनेसमुळे कंपनी बिल्डिंग मटेरियल सेगमेंटमध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणेच व्हॅल्यूएशन मिळवू शकते.

कंपनीने अनेक नवीन प्रॉडक्ट लाँच केले आहेत.
यासोबतच मजबूत डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क, मार्केट शेयर वाढण्यासह विलीनीकरणाने क्रॉस सेलिंग वाढल्याने सुद्धा अगामी काळात कंपनीच्या शेयरमध्ये तेजी येईल.
कंपनीचा प्रॉडक्ट पोर्टफोलियो डायव्हर्सिफाईड आहे जो तिच्या प्रॉफिटला चांगला आधार देईल.

Web Titel :-  earing opportunity this multibagger stock give 260 percent return in last 1 year

हे देखील वाचा :

Crude Palm Oil | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; मोदी सरकारने केली आयात शुल्कात मोठी कपात

Kolhapur News | विनाअपाॅईंटेमेंट नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा मार्ग खुला; कलेक्टर रेखावर यांचा नवा प्रयोग

Pune Court | गुन्हा दाखल करण्याच्या ‘त्या’ आदेशाला सत्र न्यायालयाची स्थगिती; उस्मान तांबोळी म्हणाले – ‘ रौनक ओसवाल यांच्यावर 5 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करणार’

Related Posts