IMPIMP

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

by nagesh
Smartphone | android 12 beta includes a new feature that will let you control your phone using facial gestures

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Smartphone | अँड्रॉईडकडे अनेक उपयोगी अ‍ॅक्सेसिब्लिटी टूल आहेत जे अपंग लोकांना आपल्या डिव्हाईसचा (Smartphone) जास्तीत जास्त लाभ घेण्यात मदत करतात. मात्र, यापैकी काही अ‍ॅक्सेसिब्लिटी सुविधा आपल्या प्राथमिक उद्देशाशिवाय कोणत्याही फोनवर खुप उपयोगी ठरू शकतात. नवीन Android 12 बीटा एका अशा वैशिष्ट्यासह येतो जो विविध चेहर्‍यांच्या हावभावांचा (facial expressions) वापर करून आपला Android फोन नियंत्रित करतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एक्सप्रेशन देऊन उघडू शकता कॅमेरा
अँड्रॉईड 12 बीटा 4 सह सहभागी अँड्रॉईड अ‍ॅक्सेसिब्लिटी सूटच्या बीटा व्हर्जन 12.0.0 मध्ये एक नवीन ‘कॅमेरा स्विच‘ फीचर आहे. फ्रंट कॅमेर्‍याचा वापर करून तुम्ही कॅमेर्‍याला हात न लावता ओपन करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ फेशियल एक्सप्रेशन्स द्यावे लागतील.

चेहर्‍याचे विविध हावभाव तुमच्या अँड्रॉईड फोनवर क्रियांना गती देऊ शकतात. उदाहरणार्थ, नोटिफिकेशन पॅनलवर जाण्यासाठी तुम्ही तुमचे तोंड उघडू शकता किंवा होम स्क्रीनवर परत येण्यासाठी भुवया उंचावू शकता.

तुम्ही तुमच्या एक्स्प्रेशन कोणत्याही कामासाठी मॅप करू शकता.
यामध्ये नोटिफिकेशन अ‍ॅक्सेस करणे, पुढे/मागे स्क्रोल करणे, टच अँड होल्ड करणे, होम स्क्रीनवर नेव्हिगेट करणे, सिलेक्ट करणे आणि खुप काही आहे.
तुम्ही चेहर्‍याच्या हावभावाचा आकर आणि कालावधीला सुद्धा सानुकुलित करू शकता.

 

कसे करावे डाऊनलोड
नवीन फेशियल जेस्चर टूल अँड्राईड 12 वर दिसले आहे.
XDA ही सुविधा वापरण्यासाठी अँड्रॉईड 11 फोनवर अपडेट करण्यात आलेल्या अँड्रॉईड अ‍ॅक्सेसिब्लिटी सूटचे एपीके लोड करण्यात सक्षम होता.
तुम्हीही असे करू शकता.
तुम्ही स्थिर अँड्रॉईड 12 रिलीजची प्रतिक्षा करू शकता किंवा अँड्राईड 12 बीटा डाऊनलोड करू शकता.

 

Web Title :- Smartphone | android 12 beta includes a new feature that will let you control your phone using facial gestures

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक; पिस्टल, काडतुसे जप्त

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

Pune Crime | खळबळजनक ! पुणे पोलिस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण

 

Related Posts