IMPIMP

WhatsApp मध्ये येणार ‘हे’ 6 धमाकेदार फीचर्स, बदलून जाईल वापरण्याची स्टाईल; जाणून घ्या

by nagesh
High Court | whatsapp group admins not liable for objectionable posts by members says kerala high court whatsapp news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– WABetaInfo नावाच्या एका वेबसाइटने व्हॉट्सअपवर (WhatsApp) आलेल्या आणि येणार्‍या बदलांची एक यादी जारी केली आहे आणि त्यापैकी अनेक फीचर्सला फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि व्हॉट्सअपचे सीईओ विल कॅथकार्ट यांच्याकडून दुजोरा मिळाला आहे. कोणते फीचर्स व्हॉट्सअपसाठी (WhatsApp) नवीन आहेत ते जाणून घेवूयात…

 

 

चॅट बबलच्या डिझाईनमध्ये बदल :

आता व्हॉट्सअपवर चॅट बबल आणखी मोठ्या आकारात गोल आणि हिरव्या रंगात असतील. सोबतच यात लाईट आणि डार्क मोडची सुविधा असेल. सध्या अँड्रॉईड यूजर्ससाठी याचे टेस्टिंग सुरू आहे.

 

 

व्हॉईस मेसेजला मिळेल नवीन इंटरफेस :

व्हॉईस मेसेजच्या एका नवीन इंटरफेसमुळे यूजर आता व्हॉईस मेसेज पाठवण्यापूर्वी ऐकू शकतात आणि ते डिलिटसुद्धा शकतील.

 

 

कॉन्टॅक्ट कार्ड दिसतील वेगळे :

व्हॉट्सअपमधील जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्या माहितीसाठी वापरले जाणारे इन्फो बटन आता कॉन्टॅक्टच्या नावाच्या शेजारी शिफ्ट होईल आणि प्रोफाइल फोटो आता एका स्क्वेयर बॉक्समध्ये दिसणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मेसेज रिअ‍ॅक्शन :

इंस्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणे आता यूजर्सला व्हॉट्सअपवर सुद्धा मेसज लाँग-प्रेस करून त्यावर इमोजीने रिअ‍ॅक्ट करता येईल.

 

 

नवीन फोटो एडिटिंग टूल्स :

‘ड्रॉईंग टूल्स’ नावाने एक नवीन अपडेट दिसेल. जे फोटो एडिट करण्यात मदत करेल. एडिटेड फोटोंवर तुम्ही स्टिकर सुद्धा लावू शकता.

 

 

नवीन पेमेंट शॉर्टकट :

व्हॉट्सअप पेमेंटचे ऑपशन चॅटबारमध्ये सुद्धा दिसेल. हा शॉर्टकट एक अ‍ॅडिशनल फीचर असेल आणि सध्याचे पेमेंट ऑपशन बदलले जाणार नाही.

व्हॉट्सअपच्या अपडेटमध्ये खुप असे फीचर आहेत ज्यांची प्रतिक्षा यूजर्स अनेक दिवसांपासून करत आहेत.
यापैकी अनेक अपडेट्स व्हॉट्सअपने यूजर्ससाठी जारी केले आहेत, काही असेही आहे जे सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहेत. आता पहायचे आहे की व्हॉट्सअप ते यूजर्ससाठी केव्हा जारी करत आहे आणि त्यांच्याशिवाय काही नवीन घेऊन येत आहे किंवा नाही.

 

Web Title : WhatsApp | whatsapp gets news update makes many big changes for android and ios users including chat bubble redesign photo editing tools and others

 

हे देखील वाचा :

Boiled Eggs Side Effect | उकडलेली अंडी खाण्याचा सर्वात मोठा साईड इफेक्ट, ‘जिम’ला जाणार्‍यांनी व्हावे सावध; जाणून घ्या

Sangli Anti Corruption | आरोपी न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणारा सहायक पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात

High Court | विवाहित असूनही इतर कुणासोबत सहमतीने संबंधात राहणे गुन्हा नाही – हाय कोर्ट

 

Related Posts