IMPIMP

High Court | विवाहित असूनही इतर कुणासोबत सहमतीने संबंधात राहणे गुन्हा नाही – हाय कोर्ट

by nagesh
Pune Crime | Bail granted to 64 year old Vijay Shankar Purohit in rape case filed at Koregaon Park Police Station

नवी दिल्ली : वृत्तसंस्था High Court | चंदीगड, पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट (Punjab and Haryana High Court) ने एक महत्वाच्या निर्णयाची सुनावणी करताना म्हटले की, जर प्रेमी युगल (Love Couple) पैकी कुणी एक विवाहित असेल तरीसुद्धा त्यांना सुरक्षा (Security) देण्यास नकार देता येऊ शकत नाही. कोर्टाने प्रकरणाची सुनावणी करताना खन्नाच्या एसएसपींना प्रेमी युगलास सुरक्षा देण्याचा आदेश जारी केला आहे. कोर्टाने म्हटले, संविधान प्रत्येकाला जीवन आणि स्वातंत्र्याच्या सुरक्षेचा अधिकार देते.

 

याचिका दाखल करत एका प्रेमी युगलाने हायकोर्टाला सांगितले की, प्रियकर अगोदरपासून विवाहित आहे आणि त्याचा घटस्फोट कोर्टात प्रलंबित आहे.
प्रेमी युगल सहमीतने संबंधात आहे आणि याचिकाकर्त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबियांकडून युगलाच्या जीवाला धोका आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

प्रेमी युगलाने सांगितले की, पत्नीच्या तक्रारीच्या आधारावर समरालाचा एसएचओ सतत त्रास देत आहे. सुनावणी दरम्यान हायकोर्टाच्या समोर अनीता आणि इतर विरूद्ध उत्तर प्रदेश सरकारसंबंधीत अलाहाबाद हायकार्टाचा एक आदेश ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये कोर्टाकडून म्हटले गेले होते की, जर जोडप्यापैकी कुणी एक जरी विवाहित असेल तर त्यांना सुरक्षा दिली जाऊ शकत नाही.

 

पंजाब-हरियाणा हायकोर्टाने म्हटले की, ते अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान करतात परंतु या
आदेशाशी ते सहमत नाहीत. कोर्टाने म्हटले की, सुप्रीम कोर्टाने आयपीसीचे कलम 497 असंवैधानिक म्हटले
आहे आणि अशावेळी प्रेमी युगलाला सुरक्षेसाठी नकार दिला जाऊ शकत नाही.

 

हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, कोणत्याही जोडप्याने सहमतीने संबंधात राहणे कोणत्याही स्थितीत
बेकायदेशीर नाही. जर दोन प्रौढ सहमतीने एकमेकांसोबत राहण्यास तयार आहे तर त्यास गुन्हा म्हटले जाऊ
शकत नाही. हायकोर्टाने या प्रकरणात पंजाब सरकार आणि इतरांना नोटीस जारी करत उत्तर मागवले आहे.

 

Web Title : High Court | being in relationship with someone else despite being married is not a crime says punjab haryana high court

 

हे देखील वाचा :

ट्रेनमध्ये प्रवास करताना काही त्रास झाला तर Rail Madad App द्वारे ताबडतोब करा तक्रार; जाणून घ्या

IRCTC नं गुंतवणुकदारांना 2 वर्षात केलं ‘मालामाल’, एक लाखाचे दिले 10 लाख रुपये; जाणून घ्या ‘कमाई’चा मार्ग

Pune Crime | ‘बाळूमामा’ यांचा अवतार असल्याचा बनाव करून लाखोंची फसवणूक ! मनोहर मामा भोसले यांच्यासह तिघांवर अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा आणि इतर कलमानुसार पहिला गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts