IMPIMP

Insecure Apps | ‘गुगल प्ले’वर 19 हजारपेक्षा जास्त अ‍ॅप असुरक्षित, अतिशय खासगी माहिती होऊ शकते सार्वजनिक; सुरक्षेचे ‘हे’ 5 उपाय लक्षात ठेवा, जाणून घ्या

by nagesh
Insecure Apps | google play store app 19 thousand aap unsafe mobile app unsafe full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Insecure Apps | गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर अशी असंख्य अ‍ॅप आहेत जी पूर्णपणे सुरक्षित (Insecure Apps) नाहीत. ही अ‍ॅप तुमची सुरक्षा धोक्यात आणू शकतात. अ‍ॅप्ससाठी अनेक प्रकारच्या परवानगी द्याव्या लागतात. प्लॅटफॉर्मवर मॅलेशियस किंवा सदोष अ‍ॅप्स (dangerous malicious apps) आहेत, जे धोकादायक असू शकतात.

 

 

तब्बल 19300 अ‍ॅप धोकादायक (19300 apps are dangerous)

डिजिटल सिक्युरिटी कंपनी अवास्टने अशा 19 हजारपेक्षा जास्त अ‍ॅपला असुरक्षित आणि धोकादायक म्हटले आहे. अशाप्रकारच्या अ‍ॅपच्या वापराने
तमची अतिशय वैयक्तिक माहिती सार्वजनिक होऊ शकते. यासोबतच तुमच्या फोनची सुरक्षा सुद्धा धोक्यात येऊ शकते. 19300 अ‍ॅप धोकादायक
असल्याचे सांगण्यात आले आहे (More than 19,000 apps on Google Play can be insecure), जे तुमची सुरक्षा पूर्णपर्ण धोक्यात आणू शकतात.

 

 

आवास्टने गुगलला दिली माहिती (Information provided by Avast to Google)

अवास्ट (Avast) ने याबाबत माहिती देताना सांगितले की, फायरबेस एक असे डिव्हाईस आहे ज्याच्या वापराने अँड्रॉईड डेव्हलपर्सद्वारे यूजर डेटा स्टोअर केला जाऊ शकतो.
यामध्ये तुमचे नाव, पूर्ण पत्ता अणि अनेक प्रकारची वैयक्तिक माहिती असू शकते.
याबाबत आवास्टने गुगल (Google) ला सुद्धा माहिती दिली आहे जेणेकरू यामध्ये सुधारणा करता येऊ शकते.

 

 

 कोणत्या प्रकारच्या अ‍ॅपमध्ये जास्त गडबड

लाईफस्टाइल (lifestyle), गेमिंग (gaming), फूड डिलिव्हरी (food delivery) आणि ईमेल (email) संबंधी बहुतांश अ‍ॅपमध्ये गडबड आढळली आहे.
अ‍ॅप यूजर्सचा डेटा सार्वजनिक आहे. हा डेटा ब्रीचचा प्रकार आहे. अ‍ॅप्लिकेशन डेव्हलप करताना Firebase चा वापर करू शकता.

 

 

सुरक्षेचे हे 5 उपाय लक्षात ठेवा (Remember these 5 safety measures)

1. यासाठी कोणतेही अ‍ॅप पडताळणी केल्याशिवाय डाऊनलोड करू नका (Do not download any app without verification).

2. अ‍ॅपच्या खालील कमेंट वाचा (Read the comments below the app).

3. अ‍ॅप किती सुरक्षित आहे, किती फायद्याचे आहे ही सुद्धा माहिती पहा (See also how safe and useful the app is).

4. अ‍ॅप डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारचे अमिष आणि सत्य न वाटणार्‍या दाव्यांपासून दूर रहा (Stay away from any kind of deceptive
and untrue claims while downloading the app).

5. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही कोण-कोणत्या गोष्टींची परवानगी देत आहात, याकडे लक्ष ठेवा (After downloading the app, keep an eye on what you allow).

 

Web Title : Insecure Apps | google play store app 19 thousand aap unsafe mobile app unsafe full details

 

हे देखील वाचा :

CoWin पोर्टलद्वारे आता दुसर्‍यांच्या व्हॅक्सीनेशनची सुद्धा मिळेल माहिती, आरोग्य मंत्रालयाने लाँच केले नवीन फीचर; जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी, लवकर करा ‘हे’ कामे, अन्यथा…

Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन् पोलिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts