IMPIMP

CoWin पोर्टलद्वारे आता दुसर्‍यांच्या व्हॅक्सीनेशनची सुद्धा मिळेल माहिती, आरोग्य मंत्रालयाने लाँच केले नवीन फीचर; जाणून घ्या

by nagesh
Aadhaar Not Mandatory For Covid Vaccination | aadhaar not mandatory for covid vaccination you can use any one document out of 9

नवी दिल्ली : वृत्तसंस्था CoWin | सध्या देशभरात कोविन (CoWin) पोर्टल (portal) द्वारे कोरोनाची लस (Corona vaccine) दिली जात आहे. याशिवाय कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर (Corona Vaccination Center) वर वॉक-इनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. मात्र, व्हॅक्सीनेशनच्या नंतर सर्टिफिकेट (vaccination certificate) प्राप्त करण्यासाठी कोविन आवश्यक आहे. कोविन पोर्टलच्या वापराने देशभरात कोट्यवधी लोकांना कोरोनापासून बचावाची लस घेतली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

नवीन सॉफ्टवेयर इंटरफेस (API) लाँच
आरोग्य मंत्रालयाने आपले कोविन पोर्टल अपग्रेड केले आहे (Ministry of Health has upgraded Covin portal). कोविन पोर्टलमध्ये एक नवीन सॉफ्टवेयर इंटरफेस (API) लाँच केले आहे, ज्याच्या मदतीने कोणतीही संस्था, संघटना, स्टोअर इत्यादी आपले कर्मचारी, ग्राहक किंवा पाहुण्यांच्या लसीकरणाची माहिती मिळवू शकतात (New methods vaccination status).

 

 

व्हॅक्सीनेशन स्टेटससाठी सध्या या पद्धतींचा वापर
या API द्वारे सहज समजू शकते की, एखाद्या व्यक्तीने कोरोनाची लस घेतली आहे किंवा नाही. सध्या लोकांना आपले व्हॅक्सीनेशन स्टेस्ट सांगण्यासाठी कोविन पोर्टलवर जाऊन सर्टिफिकेट डाऊनलोड करून दाखवावे लागत आहे.

 

नाव आणि फोन नंबरवरून मिळेल माहिती

कोविन पोर्टलमधील नवीन अपडेटनंतर लोकांना केवळ आपले नाव आणि फोन नंबर सांगावा लागेल. ज्यानंतर संस्था, संघटना स्वता व्हॅक्सीनेशनची तुमची स्थिती जाणून घेवू शकते.

 

 

KYC-VS म्हणजे Know Your Customer/Client Vaccination Status
कोविनमध्ये समावेश केलेल्या या नवीन API ला KYC-VS म्हणजे Know Your Customer/Client Vaccination Status असे नाव दिले आहे. या अंतर्गत कोविनवर कर्मचारी किंवा ग्राहकाचे नाव आणि मोबाइल नंबर टाकला जाईल, ज्यानंतर त्या व्यक्तीकडे एक ओटीपी येईल. ज्यानंतर त्या व्यक्तीचे व्हॅक्सीनेशन स्टेटस समजेल.

 

 

स्टेटसमध्ये तीन प्रकारची उत्तरे
स्टेटसमध्ये तीन प्रकारची उत्तरे येतील – व्यक्तीचे लसीकरण झालेले नाही,
अंशता लसीकरण झाले आहे (म्हणजे एक डोस), पूर्णपणे लसीकरण झालेले आहे.

 

 

येथे उपयोगी पडू शकते CoWin चे नवीन फीचर
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या एपीआय अंतर्गत लोकांच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे.
KYC-VS चा सर्वात मोठा फायदा रेल्वे स्टेशन, एयरपोर्ट, मॉल, ऑफिस, फॅक्टरी येथे होईल.
या द्वारे सहजपणे सर्व लोकांच्या व्हॅक्सीनेशन स्टेटसबाबत जाणून घेता येऊ शकते.

 

 

Web Titel :- CoWin | information about the vaccination of others will also be available through cowin new feature added

 

हे देखील वाचा :

SBI ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी, लवकर करा ‘हे’ कामे, अन्यथा…

Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन् पोलिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

 

Related Posts