IMPIMP

Post Office मधून सुकन्या समृद्धी योजनेत जमा लाखो रुपये झाले ‘गायब’, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण?

by nagesh
Post Office | lakhs of rupees deposited in sukanya samriddhi yojana disappeared from the post office

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Post Office | जर तुमचे सुद्धा Post Office च्या सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) खाते आहे तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या पोस्ट ऑफिसमधून सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana scam) आणि सेव्हिंग अकाऊंट (Savings account) अंतर्गत जमा करण्यात आलेले लाखो रुपये गायब झाले आहेत. हे प्रकरण युपीच्या बागपत जिल्ह्यातील बडौत भागातील एका पोस्टातील आहे. या घटनेने सुकन्या योजनेच्या खातेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोस्ट ऑफिसने विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्या पोस्ट मास्तरला (postmaster) निलंबित केले आहे. सोबतच त्याच्या विरूद्ध गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. या गावच्या पोस्ट ऑफिसमध्ये डझनभर ग्रामस्थांनी सुमारे 18.50 लाख रुपये जमा केले होते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, सेव्हिंग अकाऊंट आणि आरडीचे पैसे होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अकाऊंट होल्डर्समध्ये एकच खळबळ

मीडिया रिपोर्टनुसार, पोस्ट ऑफिसमधील या घोटाळ्यात पोस्ट मास्तर देवेंद्रला पकडण्यात आल्याने खातेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोस्टमास्तरकडे कुणी पैसे जमा करण्यासाठी गेले असता तो पैसे घेत असे पण त्याची एंट्री करत नव्हता. मात्र, अकाऊंट होल्डरच्या पासबुकमध्ये एंट्री करत होता. अशाप्रकारे त्याने 18 लाख 50 हजार रुपये हडपले.

अकाऊंट होल्डर्सला वाटत होते की, त्यांची रक्कम पोस्टात जमा होत आहे. काही ग्रामस्थांनी
कम्पुटरद्वारे एंट्री केली असता त्यांना खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे आढळून आले आणि प्रकरण उघडकीस आले. यानंतर तपास सुरू झाला.

 

Web Title : Post Office | lakhs of rupees deposited in sukanya samriddhi yojana disappeared from the post office

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चोरीचे 15 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील एकाला अटक

Pune Crime | कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या रागातून शो-रुम मधील कर्मचाऱ्याला मारहाण, 3 जणांना अटक

Narayan Rane | राणेंच्या अटकेचा आदेश नेमका कुणी दिला? CM ठाकरे, अजित पवार, आणि अनिल परब?

 

Related Posts