IMPIMP

VPN Service | भारतात बॅन होईल VPN सर्व्हिस, जाणून घ्या पूर्ण बातमी!

by nagesh
VPN Service | vpn should be banned in india

नवी दिल्ली : वृत्तसंस्था VPN Service | व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे व्हीपीएन (VPN Service) चा वापर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या उद्देशासाठी करतात. असे अनेक लोक आहेत जे याचा वापर भारतात उपलब्ध नसलेला कंटेन्ट (ban content) स्ट्रीम करण्यासाठी करतात, सोबतच अवैध गोष्टींचा (illegal things) वापर करण्यासाठी सुद्धा करतात जे भारतात बॅन आहे.

 

दिशाभूल करण्यासाठी वापर (Use to mislead)

Virtual Private Networks च्या माध्यमातून यूजर्स इंटरनेटची दिशाभूल करत काहीही अ‍ॅक्सेस करता, जे एखाद्या देशात उपलब्ध नाही ते सुद्धा. आणि व्हीपीएनमध्ये लोकेशन सुद्धा बदलले जाते.

 

अद्याप तारीख स्पष्ट नाही

परंतु आता गृह प्रकरणांच्या (Home Affairs) संसदीय स्थायी समिती (Parliamentary Standing Committee) ने सरकारला भारतात व्हीपीएनचा वापर बॅन करण्याची विनंती केली आहे (to ban the use of VPNs in India). मात्र अद्याप हे समजलेले नाही की बॅन कधी केले जाईल.

 

व्हीपीएन बॅन योग्य आणि अयोग्यही

व्हीपीएन बॅन करणे योग्यही आहे आणि अयोग्य सुद्धा. कारण असे असंख्य लोक आहेत जे व्हीपीएनचा वापर तेव्हा करतात जेव्हा ते आपला डिव्हाईस हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी पब्लिक नेटवर्क किंवा सर्व्हरशी जोडलेले असतात. परंतु याचा चुकीचा वापर सुद्धा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बॅन असलेल्या अ‍ॅप्सचा वापर

मागील वर्षी भारतात सरकारने चीनी अ‍ॅप्स बॅन केले होते परंतु काही लोक व्हीपीएनवरून ते अ‍ॅप्स अ‍ॅक्सेस करतात आणि सोबतच भारतात पॉर्न वेबसाइटस सुद्धा बॅन आहेत परंतु लोक व्हीपीएनवरून अ‍ॅक्सेस करतात.

 

व्यावसायिकांसाठी उपयोगी व्हीपीएन

व्हीपीएनचा वापर व्यवसायिकांद्वारे आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा केला जातो आणि यासाठी एंटरप्रायजेसच्या सर्व्हरचे स्थान बदलत राहतात.

 

डार्कवेबवरील यूजर्सला शोधण्याचा प्रयत्न

मीडियानामाच्या एका रिपोर्टनुसार, कमिटीने गृह मंत्रालयाला त्या यूजर्सची ओळख पटवण्याची
क्षमता मजबूत करण्यास सांगितले आहे जे व्हीपीएनच्या मदतीने लपलेले आहेत आणि डार्कवेबवर आहेत.

 

Web Title : VPN Service | vpn should be banned in india

 

हे देखील वाचा :

Anti Corruption | 25 हजाराची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Court | मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला

Pune Crime | ‘2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’ ! येरवडयातून ‘गँगस्टर’ सागर राजपूतनं पाठवली राणी मारणेला सांकेतिक भाषेत चिठ्ठी, दिल्या वसुलीसाठी सूचना; पोलिस तपास सुरू

 

Related Posts