IMPIMP

Digital Banking Fraud Alert | छोट्या चुकीमुळे रिकामे होऊ शकते बँक अकाऊंट, डिजिटल बॅकिंगमध्ये ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

by nagesh
Digital Banking Fraud Alert | sbi alert for digital banking fraud online cyber crime helpline number

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDigital Banking Fraud Alert | डिजिटलायझेशनच्या जगात आपल्या बँकाही डिजिटल झाल्या आहेत. आता बँकेशी संबंधित अशी अनेक कामे आहेत जी घरबसल्या काही मिनिटांत करता येतात. काही वेळा या कामांसाठी बँकेच्या लांबच लांब रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. डिजिटल बँकिंगमुळे लोकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मात्र डिजिटल व्यवहार ज्या वेगाने वाढत आहेत, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे डिजिटल बँकिंगचा आपल्याला खूप फायदा होत असला तरी त्याचे काही धोकादायक पैलूही आहेत.

 

डिजिटल बँकिंगमध्ये सुरक्षितता नेहमीच धोक्यात आली आहे. या धोक्याचा फायदा घेऊन सायबर ठग लोकांची खाते रिकामे करतात. सायबर क्राईम पोलिसांच्या (Cyber Crime Police) नोंदींमध्ये डिजिटल बँकिंग फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. (Digital Banking Fraud Alert)

 

ऑनलाइन फसवणुकीबाबत सूचना
मात्र, वेळोवेळी पोलीस प्रशासन, बँका, वित्तीय संस्थां लोकांना ऑनलाइन फसवणुकीबाबत (Online Cheating) सतर्क करत असतात. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Alert) लोकांना खोट्या मेसेजबाबत सतर्क केले आहे.

एसबीआयने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर एखाद्याला त्याचे बँक खाते ब्लॉक झाल्याचा संदेश आला तर असे संदेश पूर्णपणे बनावट आहेत. अशा मेल किंवा संदेशांना कधीही प्रतिसाद देऊ नका. असे बनावट संदेश मिळाल्यावर [email protected] वर तक्रार नोंदवा.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक टाळा

अनोळखी नावाने आलेले ईमेल, एसएमएसमधील लिंक किंवा अटॅचमेंटवर कधीही क्लिक करू नका.

लॉटरी जिंकणे, प्राप्तीकर वाचवणे, अपेक्षेपेक्षा जास्त सवलत किंवा मोफत भेटवस्तू अशा फंदात पडू नका.

बँक खाते, एटीएम किंवा डेबिट कार्ड क्रमांक, पासवर्ड आणि ओटीपी कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.

तुम्ही तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा.

सार्वजनिक ठिकाणी दिलेले मोफत वाय – फाय पैशांच्या व्यवहारासाठी वापरू नका.

 

Web Title :- Digital Banking Fraud Alert | sbi alert for digital banking fraud online cyber crime helpline number

 

हे देखील वाचा :

Baramati Accident News | भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Pune PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणूक आरक्षण सोडत मंगळवारी ! कोणाचा पत्ता होणार कट कोणाला मिळणार संधी ?

11th Admission Process Maharashtra | 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात; अर्ज कसा भराल? जाणून घ्या प्रोसेस

 

Related Posts