IMPIMP

Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू

by nagesh
Smriti Mandhana | smriti mandhana becomes the first india women cricketer to score a century in pink ball test match india vs australia

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Smriti Mandhana | भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) मध्ये होत असलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ने शानदार शतक ठोकले. हे स्मृतीच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक आहे. तिने हे शतक 170 चेंडूत 18 चौकार आणि एक षटकार मारून केले. स्मृतीने एलिसे पॅरीच्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

विराट कोहली (Virat Kohli) नंतर भारताकडून गुलाबी चेंडू कसोटीमध्ये शतक करणारी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुसरी क्रिकेटर ठरली आहे. कोहलीने 2019 मध्ये कोलकाता कसोटीमध्ये बांगलादेशविरूद्ध 136 धावांची खेळी केली होती.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्मृतीने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ 51 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. तिने चार चौकार तर एकाच षटकात डार्सी ब्राऊनच्या चेंडूवर फटकावले. स्मृती मंधानाने पहिल्या विकेटसाठी शेफाली वर्मासोबत 93 धावा केल्या होत्या. शेफाली 31 च्या धावसंख्येवर सोफी मोलिनूच्या चेंडूवर ताहलिया मॅक्ग्राकडून झेलबाद झाली.

केवळ चौथ्या कसोटी सामन्यात केले पहिले शतक

अवघ्या 18 व्या वर्षी पदार्पण करणार्‍या स्मृती मंधानाने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात सुद्धा अर्धशतक केले होते.
तिने ही कामगिरी 2014 मध्ये इंग्लंडविरूद्ध केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या कसोटीनंतर 7 वर्षानंतर भारतीय महिला टीमने इंग्लंडमध्ये लाल चेंडूने क्रिकेट खेळले होते.
हा सामना तीन महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या ब्रिस्टल मैदानावर खेळवण्यात आला, ज्यामध्ये स्मृतीने शानदार 78 धावांची खेळी केली होती.
हा सामना अनिर्णित राहिला होता.

Web Title : Smriti Mandhana | smriti mandhana becomes the first india women cricketer to score a century in pink ball test match india vs australia

हे देखील वाचा :

State Bank of India | तुम्ही सुद्धा आहात SBI ग्राहक तर मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पद्धत

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Police | पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Related Posts