IMPIMP

Supreme Court | ‘सुप्रीम कोर्टा’ने केंद्राला सुनावले; म्हणाले – ‘कोरोना मृतांच्या वारसांना मदत कधी देणार?’

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  कोरोनाच्या दुसऱ्या (Corona virus) लाटेत अनेक लोकांना मृत्युचा सामना करावा लागला. त्या लाटेत अनेक लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोना काळात मृत्यु (Death) झालेल्या लोकांच्या कुटूंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला (Central Government) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावले आहे. कोरोनोने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई आणि मृत्यू प्रमाणपत्राशी संबंधीत प्रकरणात केंद्र सरकारने अहवाल सादर न केल्याने सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नाराजी व्यक्त केलीय. तसेच यावरुन 11 सप्टेंबर पर्यंत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

न्या. एमआर शाह (Justice MR Shah) आणि न्या. अनिरुद्ध बोस (Justice Aniruddha Bose)
यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी दरम्यान म्हटले की, सरकारला आधीच हा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
परंतु, तरीही सरकारने या आदेशाचे पालन केले नाही.
आता तिसरी लाट येण्याची शक्यता दैनदिंन वाढत चालली आहे. तर, 30 जूनला कोरोनामुळे
मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला होता.
मात्र तरीही केंद्र सरकारने अजूनही या निर्णयावर अंमलबजावणी केली नाही.
ही मदत पोहचेपर्यंत तिसरी लाट देखील संपेल, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्र सरकारची कान उघडणी केलीय.

दरम्यान, अ‍ॅडीशनल सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी (Additional Solicitor General Aishwarya Bhati) यांनी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करु शकलो नाही याबाबत सरकारतर्फे दिलगिरी व्यक्त केला.
सरकार सातत्याने तज्ज्ञांशी चर्चा करत असून, कोर्टाने 10 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली आहे. कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत 11 सप्टेंबरला (September 11) अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title : Supreme Court | Supreme Court | The Supreme Court ruled the Center; Said When will Corona help the heirs of the dead?

 

हे देखील वाचा :

Shivsena MP Bhavana Gawali | शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ

Nanded Crime | वडिलानेच आपल्या पोटच्या मुलीची केली 3 वेळा विक्री; नांदेड मधील धक्कादायक घटना

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 152 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts