IMPIMP

Taliban Terrorism | अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी, ’तात्काळ’ मायदेशी परतण्याचा सल्ला

by nagesh
Taliban Terrorism | indian embassy security advisory issued for indians living in afghanistan

काबुल : वृत्तसंस्था Taliban Terrorism | अफगाणिस्तानात तालिबानचा दहशतवाद (Taliban terrorism) वाढतच चालला आहे, अमेरिकन सैनिक घरी परतल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी (militants) अनेक शहरांवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये राहात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षाच्या दृष्टीने आज भारतीय दूतावासाने (Indian Embassy) एक सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी (security advisory) जारी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अ‍ॅडव्हायजरीमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना तात्काळ प्रवास व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय दूतावासाने भारतीय कंपन्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रोजेक्ट साईटवरून आपल्या भारतीय कर्मचार्‍यांना तात्काळ परत बोलावण्याचा सल्ला (Advice to return home immediately) दिला आहे.

 

 

भारतीय दूतावासाने अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये जसजशा अनेक भागात हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत, तस-तसे शहरांमध्ये विमानसेवा आणि इतर वाहतूक पर्याय बंद होत आहेत.

 

 

अ‍ॅडव्हायजरीत पुढे म्हटले आहे की, अफगाणिस्तानात येणे, राहणे आणि काम करणार्‍या सर्व नागरिकांना सल्ला दिला जात आहे की, सध्या उपलब्ध व्यावसायिक उड्डाणांच्या उपलब्धतेची माहिती घेत राहावे, आणि संधी मिळताच प्रवासाची व्यवस्था करावी.

 

 

कोणत्याही स्थितीत व्यावसायिक विमानसेवा बंद होण्यापूर्वी भारतात परतण्यासाठी त्वरित प्रवास व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

 

 

अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि नाटो दलांच्या परतीनंर तालिबानने देशावर कब्जा करण्याचे
आपले अभियान वाढवले आहे. देशाच्या ग्रामीण भागाच्या मोठ्या भागावर कब्जा केल्यानंतर
तालिबानने आता प्रमुख शहरांना बळकावण्यास सुरूवात केली आहे.

 

 

मागील काही दिवसात तालिबानने देशातील पाच प्रांतांच्या राजधानीवर कब्जा केला आहे. तालिबान
शहरांत घुसण्यासोबतच मरणार्‍यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. तालिबानने या
हिंसक हल्ल्यांमध्ये अफगाणी जवानांसह महिला, मुले, मशिदी आणि मौलवींना सुद्धा निशाणा
बनवले आहे.

 

Web Title : Taliban Terrorism |indian embassy security advisory issued for indians living in afghanistan

 

हे देखील वाचा :

LIC Micro Bachat Insurance Policy | ‘एलआयसी’च्या ‘या’ पॉलिसीत रोज 28 रुपये बचत केल्यास होईल 2 लाखाचा फायदा; जाणून घ्या कसा?

Pune Crime | खळबळजनक ! व्याजाच्या पैशासाठी सावकाराने केली शरीर सुखाची मागणी, बंदूकीच्या धाकावर केला बलात्कार

Central Government | जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? केंद्र सरकारकडून संसदेत माहिती सादर

 

Related Posts