IMPIMP

Toll GPS System | टोल प्लाझावरून जाणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 3 महिन्यात सुरू होणार तुमच्यासाठी नवीन सुविधा; जाणून घ्या

by nagesh
No Toll Plaza on Highway | no toll plaza on national highway government is bringing anpr system much better than fastag

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोल प्लाझासाठी केंद्र सरकार पुढील तीन महिन्यात एक नवीन पॉलिसी (new policy for toll plazas) घेऊन येणार आहे. या पॉलिसी अंतर्गत टोल प्लाझावर जीपीएस आधारित ट्रॅकिंग टोल सिस्टम (GPS based tracking toll system) ची व्यवस्था केली जाईल. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितिन गडकरी (Union Minister for Roads, Transport and Highways Nitin Gadkari) यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना गडकरी म्हणाले, सध्या देशात जीपीएस आधारित ट्रॅकिंग टोल टेक्नॉलॉजी (GPS-based tracking toll technology – System) उपलब्ध नाही.

 

मंत्रालय सध्या भारतात हे तंत्रज्ञान विकसित करत आहे. यावर्षी मार्च महिन्यात गडकरी यांनी घोषणा केली होती की भारतात टोल बूथ पूर्णपणे बंद करून संपूर्ण जीपीएस आधारित टोल कलेक्शन (GPS-based toll collection) ची सुविधा यावर्षापर्यंत सुरू होईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 स्टील आणि सिमेंटवर खर्च कमी करण्याचा प्रयत्न

गडकरी यांनी रस्ते बांधकाम कंपन्यांना म्हटले की, त्यांनी रस्ते तयार करताना कमी प्रमाणात सिमेंट आणि स्टीलचा वापर करण्याचा प्रयत्न करवा. यातून रस्ते निर्मितीचा खर्च खुप कमी होईल. सिमेंट आणि स्टील विक्रेते देशभरात गटबाजी करत आहेत. यास तोंड देण्यासाठी त्यांनी कन्सल्टंटला एखादी अशी पद्धत शोधून काढायला सांगितली ज्यामुळे रस्ते निर्मितीत सिमेंट आणि स्टीलचा वापर आणि खर्च दोन्ही कमी होईल.

 

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गडकरी म्हणाले, मी सर्वांना आश्वस्त करतो की, एक वर्षाच्या अता देशभरात टोल बूथ पूर्णपणे हटवले जातील. याचा अर्थ आता टोल कलेक्शनचे काम जीपीएसद्वारे होणार. वाहनांचे जीपीएस इमेजिंकद्वारे पैसे कापले जातील.

 

जीपीएस आधारित सिस्टमद्वारे कसे कापणार पैसे?

यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये गडकरी यांनी म्हटले होते की, टोल कलेक्शनसाठी नवीन जीपीएस
आधारित सिस्टम सुरू केली जाईल. यासाठी रशियन एक्सपर्टची मदत सुद्धा घेतली जात आहे. या
सिस्टमअंतर्गत टोलची रक्कम वाहन मालकाच्या अकाऊंटमधून किंवा त्यांच्या ई-वॉलेटमधून एकुण
अंतराच्या आधारावर आपोआप कापून घेतली जाईल. या दरम्यान त्यांनी हेसुद्धा सांगितले की, नवीन
पॅसेंजर आणि कमर्शियल वाहनांमध्ये ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) ची सुविधा मिळते. सरकार जुन्या
वाहनांमध्ये सुद्धा ते इन्स्टॉल करण्यासाठी मार्ग शोधणार आहे.

 

सध्या फास्टॅगची सुविधा उपलब्ध

देशभरात सध्या फास्टॅगद्वारे टोल कलेक्शन सिस्टम आहे. ती नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया
(NHAI) द्वारे ऑपरेट केली जाते. या सिस्टम अंतर्गत, वाहनांच्या विंडस्क्रीनवर फास्टॅग चिटकवला
जातो. टोल प्लाझावर टोल कलेक्शनसाठी वाहनाला थांबावे लागत नाही. फास्टॅगद्वारे टोलची रक्कम
कापली जाते.

 

Web Title : Toll GPS System | nitin gadkari says government will unveil new policy on gps enabled toll system within 3 months

 

हे देखील वाचा :

Twitter ची Congress च्या अनेक नेत्यांवर कारवाई, लॉक केले ऑफिशियल अकाऊंट; जाणून घ्या कारण

Pune Crime | भाड्याने लावतो असे सांगून परस्पर गाडी विकणाऱ्या दोघांना अटक

Raj Kundra Pornography Case | शर्लिन चोपडाने शेयर केला राज कुंद्रासोबतच्या पहिल्या शूटचा फोटो, म्हणाली – ‘माझ्यासाठी नवा अनुभव होता’

 

Related Posts