IMPIMP

Aurangabad Crime | औरंगाबादमधील धक्कादायक घटना ! विजेचा शॉक लागून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू

by nagesh
Aurangabad Crime | two brothers died due to electric shockos in aurangabad crime news

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Aurangabad Crime | औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील बायगाव शिवारात 2 सख्ख्या भावांचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू (Death) झाल्याची घटना (Aurangabad Crime) घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. बायगाव परिसरात सुसाट सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे विजेचे तार बैलगाडीवर पडून ही घटना घडली आहे.

 

साहेबराव गणपत चेळेकर Sahebrao Ganpat Chelekar (वय, 70), लहान बंधू बाबुराव गणपत चेळेकर Baburao Ganpat Chelekar (वय, 57) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. हे बंधू एकत्र कुटुंबात राहतात. दरम्यान पाऊस बंद झाल्याने शेतातील कामासाठी दोघे शेतात गेले होते. त्यानंतर संध्याकाळी शेतातील काम आटपून साहेबराव चेळेकर लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे निघाले. तेव्हा शेजारील एका शेतकऱ्याने विनाखांब नेलेली विजेची तार उंची कमी असल्याने साहेबराव यांच्या बैलाच्या शिंगात अडकली. यामुळे वीजप्रवाह बैलगाडीत उतरला आणि बैलासह साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला. (Aurangabad Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, घटनास्थळावरुन मोठा आवाज आल्याने बाबुराव चेळेकर यांनी धाव घेत आपल्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
पण यावेळी त्यांना देखील विजेचा शॉक लागल्याने त्यांचा सुद्धा जागीच मृत्यू झाला आहे.
त्यानंतर परिसरात असणा-या शेतकऱ्यांनी वीजप्रवाह बंद करून दोन्ही भावांना देवगाव रंगारी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

Web Title :- Aurangabad Crime | two brothers died due to electric shockos in aurangabad crime news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains Update | राज्यात काही भागात ‘धो-धो’ पाऊस; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, पावसामुळे शेती पिकांचेही नुकसान

Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणूक पुण्यातील प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार

Cyber Insurance Policy | ऑनलाईन फ्रॉडचे नुकसान टाळायचे असेल तर घ्या सायबर विमा पॉलिसी, जाणून घ्या तिचे फायदे

 

Related Posts