IMPIMP

Beed News : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिण, भावजीच्या गाडीला भीषण अपघात, दोघेही जागीच ठार

by sikandershaikh
beed-accident-sudhir-mungantiwar-sister

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन  – Sudhir Mungantiwar | भरधाव वेगात जाणा-या कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांची चूलत बहीण आणि भावजी जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  बीड जिल्ह्यातील चकलांबा (ता. गेवराई) येथे बुधवारी (दि. 24) सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार हे दोघेही बुधवारी पुसद येथून आपल्या स्वतःच्या वाहनाने पुणे येथे राहणा-या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र  तरवणी येथे आल्यानंतर भरधाव वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाखाली जाऊन भीषण अपघात झाला. यात दोघे पती, पत्नी जागीच ठार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे.

Related Posts