IMPIMP

Business Idea : स्टॅम्प पेपरच्या व्यवसायातून भरपूर पैसा कमावण्याची संधी ! कमी पैशात मिळेल जास्त नफा, जाणून घ्या

by sikandershaikh
stamp-paper

नवी दिल्ली :वृत्तसंस्थाBusiness Idea | असे अनेक लोक आहेत ज्यांना व्यवसायात रस असतो. कमीत कमी गुंतवणुकीत त्यांना जास्त नफाही हवा असतो. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत. स्टॅम्प पेपर विक्रेता हा व्यवसायाचा एक चागला पर्याय आहे. यासाठी परवानाही सहज मिळतो.

यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा परवाना घ्यावा लागणार आहे. इतकंच नाही तर स्टॅम्प पेपर विकण्यासाठी नोंदणी करा, यानंतर मर्यादित पैशासाठी स्टॅम्प पेपर विकू शकता. खरंतर सध्या अनेक प्रवासी ऑपरेटर हे काम करत आहेत. यासाठी आधार पॅन आणि सरकारी योजनांशी संबंधित काम करून चांगले पैसे मिळवता येतात.

कसा मिळेल परवाना ?

अनेक राज्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळं परवान्यासाठी तुम्हीही ऑनलाईन अर्ज करू शकता. सध्या ई स्टॅम्प पेपरला जास्त महत्त्व आहे. आधीसारखे स्टॅम्प पेपर आता उपलब्ध नाहीत त्यामुळं तुम्ही ईस्टॅम्प पेपरच्या छपाईचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी सरकार परवानाही देईल.

ई स्टॅम्प विक्रेता होण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रं

यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, सीएससी आयडी, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, शैक्षणिक सर्टिफिकेट, संगणक सर्टिफिकेट अशी कागदपत्रे तुम्हाला शासनाला सादर करावी लागतात.

कसा होतो नफा ?

प्रत्येक स्टॅम्प विक्रीवर कमिशन दिलं जातं. आधी विक्रेत स्टॅम्पवर जास्तीत जास्त पैसे घ्यायचे.
परंतु आता तुम्ही ई स्टॅम्पच्या विक्रीतून चांगले पैसे कमावू शकता.

Related Posts