IMPIMP

‘पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी चालेल पण आम्ही षंढ म्हणून वावरणार नाही’

by pranjalishirish
suresh dhas stand lockdown beed district aashti traders demand

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बीड जिल्ह्यात 25 मार्चच्या रात्री 12 वाजेपासून 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात आमदार सुरेश धस Suresh Dhas  व्यापाऱ्यांसह आज रस्त्यावर उतरले. तसेच व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन काळात दुकाने सुरु ठेवली. 10 दिवसांचा लॉकडाऊन मान्य नसून प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खायची तयारी आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी चालेल पण आम्ही षंढ म्हणून वावरणार नाही अशी आक्रमक भूमिका आमदार धस यांनी घेतली. यामुळे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत तातडीने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील लॉकडाऊन 29 मार्चपासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल असे जाहीर केले.

अजितदांदाच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, म्हणाले – ‘मी लस घेतली, पण फोटोसाठी नौटंकी केली नाही, कारण…’

आमदार सुरेश धस Suresh Dhas यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा केलेला लॉकडाऊन आम्हाला मान्य नसून आष्टी तालुक्यातील सर्व व्यावसायिक दुकानदार व्यापारी यांना सकाळी 9 ते 1 या कालावधीत दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा शनिवार (दि.27) पासून सर्वच दुकाने तीन दिवस बंद करावीत. असे आष्टीच्या नगरपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत धस यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण आहेत तिथे कडक निर्बंध लावा. मात्र, संपूर्ण तालुक्यात लॉकडाऊन करु नका. यामुळे सर्वसामान्य भरडला जाईल, अशी भूमिका आमदार धस यांनी घेतली.

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

नगरपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीला उपविभीगाय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजाभाऊ कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे, नायब तहसीलदार ,नीलिमा थेऊरकर, मुख्याधिकारी नीता अंधारे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, व्यापारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार आष्टी शहरातील लॉकडाऊन 29 मार्च पासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची कारवाई करण्यात येईल असे पत्र उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी आमदार धस Suresh Dhas  यांना दिले.

 

Also Read : 

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

Related Posts