IMPIMP

Sanjay Raut | मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावरील संजय राऊतांच्या उत्तराला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर, म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | sanjay gaikwad replied to sanjay raut statement on cm eknath shinde speech in vidhansabha

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी टीका केली होती. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय गायकवाड म्हणाले की, ‘विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने जनतेला भूरळ घातली आहे. संजय राऊतांच्या(Sanjay Raut) भाषणासारखा पांचटपणा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात नसतो. संजय राऊतला चाबरेपणा करायची सवयच आहे. त्याला वाटतं आपल्यासारखचं मुख्यमंत्र्यांनी करायला हवं. मात्र त्याच्यात आणि मुख्यमंत्र्यांच्यात खूप फरक आहे. मुख्यमंत्री त्यांनी केलेल्या कामावर बोलतात. मात्र संजय राऊत …… आहे. त्याने आयुष्यात काहीही काम केलेले नाही. म्हणुनच त्याला दुसऱ्याची भाषणं गल्लीतली वाटतात.’ असा घणाघात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

 

तसेच, निवडणूकीबाबत संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील आमदारांना उद्देशून एक विधान केले होते.
ते म्हणाले होते की, जर आगामी निवडणूकीत भाजपचे लक्ष हे १४५ जागांचे असेल तर शिंदे गटाचे आमदार
काय धुणी-भांडी करणार आहेत का? असा टोला शिंदे गटातील आमदारांना लावला होता. त्यावर संजय गायकवाडांना विचारले असता ते म्हणाले की, जर भाजपचे लक्ष हे १४५ जागा जिंकण्याचे असेल तर आमचेही लक्ष १०० जागा जिंकण्याचे आहे. त्यामुळे निवडणुकांनंतर संजय राऊतांकडे धुणी-भांडी करण्याचेच काम शिल्लक राहील. असे प्रतिउत्तर संजय गायकवाडांनी संजय राऊतांना दिले.

 

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना एकसंध होण्याबाबत एक विधान केले होते.
त्यात त्यांनी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षण करण्याबाबतचा सल्ला दिला होता.
त्यांच्या या वक्तव्यावर देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दीपक केसरकरांवर
चांगलीच टीका केली होती.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay gaikwad replied to sanjay raut statement on cm eknath shinde speech in vidhansabha

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | पडळकरांच्या मागणीवर सरकार सकारात्मक; उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांनंतर बदलणार ‘या’ जिल्ह्याचे नाव

Maharashtra Politics | ‘आम्ही 50 जण एकदिलाचे, 15 राहिलेत, किती सांभाळता येतील ते सांभाळा’

Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज

 

Related Posts