IMPIMP

Mumbai Crime | महिलेच्या ‘शीला’ची किंमत PSI ने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप ! ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMumbai Crime | महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्यात (Rape Case In Mumbai) संबंधित महिलेची समजूत काढून तिला बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३७ लाखांची लाच मागून त्यापैकी ७ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau (ACB) Mumbai सापळा रचून एका पोलीस उपनिरीक्षकाला (Police Sub Inspector) रंगेहाथ पकडले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाने या महिलेच्या शीलाची किंमत लावल्याने महिला दिनी (International Women’s Day) संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. (Mumbai Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

भरत लक्ष्मणराव मुंढे (PSI Bharat Laxmanrao Mundhe) असे अटक केलेल्या या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात नाव आल्याने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे (NM Joshi Marg Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे (Senior Police Inspector Rajesh Kevle) हे रजेवर गेले आहेत. (Mumbai Crime)

 

या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
भरत मुंढे याचा या प्रकरणाशी तसा काही संबंध नव्हता. शिवाय या गुन्ह्याचा तपास मुंढे याच्याकडे नव्हता.
तक्रारदाराच्या नातेवाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्यात काही करता येईल का यासाठी तक्रारदाराकडून भरत मुंढे याच्याशी संपर्क साधण्यात आला होता.
गुन्हा दाखल झालेली पार्टी मोठी असल्याचे लक्षात आल्यावर ही संधी साधण्याची खेळी मुंढे याने खेळली. त्याने तक्रारदार याला तुम्हालाही सहआरोपी करतील, असे सांगत घाबरवून सोडले.
या गुन्ह्यात तक्रारदार हिची समजूत घालता़ तुमच्याविरुद्ध तक्रार करु नये, यासाठी तिला ३० लाख रुपये द्यावे लागतील.
तसेच माझ्यासाठी ५ लाख व वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने तक्रारदार यांना सांगितले होते. त्याची लेखी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Mumbai) करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ७ लाख रुपये घेताना भरत मुंढे याला रंगेहाथ पकडण्यात आले (ACB Cought Raid Hand). त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांचे नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात त्यांचा खरोखरच सहभाग होता का ?. का पैसे उकळण्यासाठी त्याने स्वत:हून त्यांचे नाव घेतले. तो या पिडित महिलेच्या संपर्कात होता का ?. तिला तो पैसे देणार होता की स्वत:च ते हडप करणार होता, हा तपासाचा भाग असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांचे नाव आल्याने ते अडचणीत आले आहेत.
त्यामुळे त्यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या हाताखालील अधिकार्‍यांच्या (Mumbai Police) कामावर पर्यवेक्षण ठेवण्यास अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे.

 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज सकाळी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आजवर चांगले काम केले आहे.
भरत मुंढे याच्याविषयी यापूर्वी अनेक तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Mumbai Crime | Statewide outrage over PSI taking Rs 7 lakh Bribe

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) छापेमारी; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस व कागदपत्रे जप्त

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला दिनाच्या पूर्व संध्येला बलात्काराच्या गुन्हात आरोपी न करण्यासाठी 37 लाखाच्या लाचेची मागणी; 7 लाख अ‍ॅडव्हान्स घेताना पोलिस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात, 2 लाख वरिष्ठ निरीक्षकासाठी तर 30 लाख पीडितेसाठी

Nandurbar Police | टँकर चोरणाऱ्याला नंदुरबार पोलिसांकडून अटक, 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts