IMPIMP

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल

by nagesh
Sameer Wankhede | former ncb officer sameer wankhede got threat on twitter account

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) NCB कडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीकडून करण्यात आलेल्या अनेक कारवाया या बनावट असल्याचे सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे (Caste certificate) नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) उडी घेतली आहे.

 

 

 

जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करताना त्यांना ‘पेहचान कौन?’ असा सवाल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे ट्विट नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ केल्याची चर्चा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा (Mumbai Cruise Drug Case) पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला आहे. याशिवाय एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र (Fake caste certificate) घेऊन नोकरी मिळवली, एससी सर्टीफिकेट (SC Certificate) मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्माचा दाखला (Birth certificate) खरा आहे. ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) नाव आहे. पूर्ण परिवार मुस्लिम (Muslim) म्हणून जगत आहेत, हे सत्य आहे. आम्ही दलित संघटनांबरोबर बोलत आहोत. यासंदर्भात दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल, असंही मलिक यांनी सांगितले. (Mumbai Cruise Drug Case)

 

Web Title: Mumbai Cruise Drug Case | ncp leader and minister jitendra awhad jumps into ncb officer sameer wankhede row he tweet photo and ask question

 

हे देखील वाचा :

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ‘बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?’

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना? प्रशासन, स्थायी समितीमध्ये अद्याप बोनसचा ‘प्रस्ताव’ नाही

Pune News | ‘इट इंडिया फाउंडेशन’तर्फे चादरींचे वाटप

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

 

Related Posts