IMPIMP

Mysuru Rape Case | बलात्कारप्रकरणी मंत्र्याचा अजब सवाल; म्हणाले – ‘सुर्यास्तानंतर ती तिथे गेलीच का?’

by nagesh
Mysuru Rape Case | karnataka home minister blames mysuru rape survivor why go there after sunset

बंगळुरु : वृत्तसंस्था दोन दिवसांपूर्वी म्हैसूरमध्ये चामुंडी येथे फिरायला गेलेल्या एमबीएच्या विद्यार्थीनीवर (MBA student) सामूहीक बलात्कार (Mysuru Rape Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हैसुर येथे घडलेल्या बलत्काराच्या (Mysuru Rape Case) घटनेत पीडितेला न्याय देण्याऐवजी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी (Karnataka Home Minister) सूर्यास्तानंतर ती तिथे गेलीच का? असा अजब सवाल केला आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) प्रकरणातील गुन्हेगार अद्यापही फरार असून त्यांना पकडणे अपेक्षित आहे. परंतु गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र (Araga Jnanendra) यांनी उलट सवाल करत वादग्रस्त विधान केलं आहे.

एकप्रकारे त्यांनी मुलीलाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. पीडीत मुलीबरोबर जे घडलं, त्या बद्दल संवेदनशीलता दाखवून राज्य महिलांसाठी अधिक सुरक्षित करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु राज्याचे गृहमंत्रीच नाही तर इतर काही जणांनी पीडित मुलगी संध्याकाळच्यावेळी बाहेर का गेली ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतल्यानंतर गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले, संध्याकाळी सात-साडेसातला ती मुलगी तिथे काय करत होती ? सूर्यास्तानंतर (After sunset) ती तिच्या वर्गमित्रासोबत तिथे का गेली होती ? पण आम्ही काय करु शकतो, लोक कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी जायला मोकळे आहेत, असे ते म्हणाले.

 

काय आहे प्रकरण ?

पीडितेची प्रकृती गंभीर असून ती जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांनी तिच्या मित्राचा
जबाब नोंदवला आहे. त्यानुसार पीडिता ही कर्नाटकची रहिवासी नसून त्याठिकाणी शिकण्यासाठी
आलेली आहे. ती तिच्या मित्रासोबत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जंगल
परिसरात (forest area) असलेल्या हेलिपॅडकडे (helipad) गेली होती. त्याचवेळी चार ते पाच जण त्यांचा पाठलाग करत होते. दोघेही एकाकी असल्याचा फायदा उचलून त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सर्व आरोपी दारू प्यायलेले होते. त्यांनी सुरुवातीला या जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर तरुणीला झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिच्या मित्राने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. तिच्या मित्राच्या जबाबावरुन अलानाहल्ली पोलीस ठाण्यात (Alanahalli Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

 

Web Title : Mysuru Rape Case | karnataka home minister blames mysuru rape survivor why go there after sunset

 

हे देखील वाचा :

Financial Tasks | सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी पूर्ण करा आपल्या पैशांशी संबंधीत ही 5 कामे, जाणून घ्या कोणती

E-Shram Card | असं तयार होतं ई-श्रम कार्ड ! ‘ही’ आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ज्यामुळं काही मिनीटांमध्येच होतंय काम; जाणून घ्या

NCP Leader Eknath Khadse | एकनाथ खडसेंना ED चा झटका; लोणावळा आणि जळगावमधील 5 कोटींची मालमत्ता केली जप्त

 

Related Posts