IMPIMP

E-Shram Card | असं तयार होतं ई-श्रम कार्ड ! ‘ही’ आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ज्यामुळं काही मिनीटांमध्येच होतंय काम; जाणून घ्या

by nagesh
E-Shram Card | e shram card registration know how to make card online see here step by step process of this card making

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाE-Shram Card | केंद्र सरकारने ‘ E-Shram’ पोर्टलची सुरुवात केली असून याद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना फायदा होणार आहे. या वेबसाइटद्वारे मजूर आपले E-Shram Card बनवू शकतात आणि ज्या लोकांचे हे कार्ड तयार होईल त्यांना सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातील. सोबत मजूरांसाठी सुरू केलेल्या योजनांचा सुद्धा लाभ प्रथम या लोकांना होईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

E-Shram Card कसे बनवावे ते जाणून घेवूयात…

सर्वप्रथम वेबसाइट https://eshram.gov.in/ वर जा. नंतर सेल्फ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा.
आता आधारसोबत लिंक केलेल्या नंबरसोबत ओटीपीद्वारे लॉगिन करा.
यानंतर आधार नंबर भरा आणि ओटीपीद्वारे प्रोसेसमध्ये पुढे जा. आता तुमची माहिती पुढे येईल, ती अ‍ॅक्सेप्ट करा.

यानंतर पुढे विविध प्रकारचे फॉर्म भरावे लागतील. ज्यामध्ये पहिल्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल. यानंतर रेसिडेन्शियल डिटेलचा फॉर्म भरावा लागेल.
यामध्ये दुसर्‍या राज्यातील लोकांसाठी वेगळे ऑपशन आहे.

  एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती द्या. यानंतर सेव्ह करत पुढे जा. नंतर occupation And Skills चा फॉर्म असेल. यामध्ये जे काम करता, ते सिलेक्ट करा.
समजा तुम्ही पोर्टलवर दिलेल्या यादीत तुमच्या कामाचे क्षेत्र शोधू शकत नसाल तर तेथील पीडीएफद्वारे सुद्धा वर्क एरिया शोधू शकता आणि त्याचा कोड कॉपी करून त्यामध्ये भरू शकता.
या पीडीएफमध्ये वर्क एरियाची माहिती हिंदी आणि इंग्रजीत मिळेल.

यानंतर तुम्हाला बँक अकाऊंटची माहिती द्यावी लागेल. यामध्ये बँक अकाऊंट नंबर, नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
त्यास ओके केल्यानंतर आपल्याकडून भरलेली सर्व माहिती मिळेल, जी तपासून तुम्ही ओके करू शकता.
नंतर ओटीपी मिळेल आणि ओटीपी भरल्यानंतर तुमचे कार्ड स्क्रीनवर येईल, ज्यामध्ये क्यूआर कोडसुद्धा असतो.

 

काय उपयोग आहे ई श्रम पोर्टलचा

ई श्रम पोर्टलच्या मदतीने मजूरांचे आकडे आणि माहिती जमवली जाईल.
त्याचा आधारावर मजूरांसाठी योजना आणि नियम बनवले जातील.
सरकार ठरवेल की, योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील मजूरांपर्यंत कसा पोहचवावा.

सरकारकडून देशातील सर्व मजूरांसाठी ओळखपत्र आणि आधार कार्डप्रमाणे त्यांच्या कामाच्या आधारावर श्रेणीमध्ये विभागले जाईल.
याचा आधारावर सरकार मजूरांचा रेकॉर्ड तयार करेल.
सरकारची तयारी ई-श्रम पोर्टलवर जवळपास 38 कोटी मजूरांचे रजिस्ट्रेशन करण्याची आहे.

 

Web Title : E-Shram Card | e shram card registration know how to make card online see here step by step process of this card making

 

हे देखील वाचा :

NCP Leader Eknath Khadse | एकनाथ खडसेंना ED चा झटका; लोणावळा आणि जळगावमधील 5 कोटींची मालमत्ता केली जप्त

Corona 3rd Wave | तिसर्‍या लाटेची चाहूल? पुन्हा नवीन केस 40 हजारच्या पुढे, अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे सुद्धा वेगाने वाढली

 

 

Related Posts