IMPIMP

NCP Leader Eknath Khadse | एकनाथ खडसेंना ED चा झटका; लोणावळा आणि जळगावमधील 5 कोटींची मालमत्ता केली जप्त

by nagesh
NCP Leader Eknath Khadse | enforcement directorate (ED) seizes properties ncp leader eknath khadse connection bhosari midc land deal case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पुण्यातील भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) भूखंड खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचालनालयाकडून एक मोठा झटका देण्यात आला आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त (Property confiscated) करण्यात आली आहे. खडसेंची (NCP Leader Eknath Khadse) लोणावळा आणि जळगावमधील संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर आलीय. एकूण 5 कोटीची (5 crores) मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणी (Plot purchase case) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे चांगलेच
अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसापासून ED च्या रडारवर असणारे खडसेंची मालमत्ता अखेर ED ने जप्त केली आहे. मागील
काही दिवसापासून खडसे आणि त्यांच्या कुटूंबियांची चौकशी सुरूय. एका प्रकरणामध्ये खडसे यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना देखील अटक केली होती. त्यानुसार पेमेंट गेटवेसह बँक खाती आणि व्हर्च्युअल खात्यांमध्ये असलेले 106.93 कोटी रुपये ED कडून जप्त करण्यात आले होते.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी 2016 साली पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी
केल्याचा आरोप आहे. या जमिनीचा दर 31 कोटी होता, मात्र, जावई गिरीश चौधरी (Girish
Chaudhary) यांनी ही मालमत्ता केवळ 3 कोटींना विकत घेतली. ही जमीन MIDC च्या मालकीची होती. खडसे हे त्यावेळी महसूलमंत्री होते. अगदी अल्प भावात गिरीश चौधरी यांना ही जमीन देण्यात आली. गिरीश यांच्याकडे असलेल्या 3 कोटी रुपयांचा नेमका स्रोत काय? याबाबत चौकशी सक्तवसुली संचालनालय (ED) करत आहे.

 

Web Title : NCP Leader Eknath Khadse | enforcement directorate (ED) seizes properties ncp leader eknath khadse connection bhosari midc land deal case

 

हे देखील वाचा :

Corona 3rd Wave | तिसर्‍या लाटेची चाहूल? पुन्हा नवीन केस 40 हजारच्या पुढे, अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे सुद्धा वेगाने वाढली

Gold-Silver Price Today | घसरणीनंतर सोने महागले, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

UIDAI | आधार कार्ड धारकांना नाही मिळणार ‘या’ दोन सुविधांचा लाभ, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

 

Related Posts