IMPIMP

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना

by nagesh
Nashik Crime | nashik satpur an old argue ended up finished a young man

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाईन – Nashik Crime | नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गेल्या 24 तासात दोन खुनाच्या (Murder) घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे नाशिक शहर हादरुन गेले आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच नाशिक शहरात (Nashik Crime) दुसरी खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिक शहरात (Nashik Crime) एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी दुपारी वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर सातपूर परिसरातील गोरक्षनाथ रोड, काश्मीरे मळा परिसरात रात्री 11 ते 12 च्या दरम्यान दोघांमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन त्यात एकाकडून दुसऱ्याच्या डोक्यात रॉड मारला. यामध्ये गंभीर जखमी त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयस्वाल (वय-30 रा. काश्मिरे चाळ, मुळगाव आझमगड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख (ACP Sohail Shaikh),
सातपूर पोलीस ठाण्याचे (Satpur Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण
(Senior Police Inspector Mahendra Chavan), पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर
(Police Inspector Satish Ghotekar), गुन्हे शाखेचे (Crime Branch) मोहिते,
डी.के.पवार यांच्यासह पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, संतोषचा मृत्यू झाल्याचे
समजताच आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मयत जयस्वाल हा गॅरेजमध्ये काम करत होता. त्याने फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर आरोपीने हसल्याची
कमेंट केली होती. यावरून दोघांचे वाद असल्याचे समजते. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nashik Crime | nashik satpur an old argue ended up finished a young man

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान

Pune Crime News | रणजित रामगुडेबरोबर फिरतो म्हणून तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Palak Tiwari | पलक तिवारीच्या नव्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

 

Related Posts