IMPIMP

Parambir Singh | जाणून घ्या परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब ते अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh told ed that parambir singh is mastermind in antilia bomb scare and mansukh hiren case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Parambir Singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींची वसुलीचा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवले होते. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. इतकाच नाही तर देशमुखांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) व सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर (ED) पोहोचविले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

२० मार्चला परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari ) यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये असे म्हंटले होते की, कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन (mansukh hiren) हत्या प्रकरणा क्राईम इंटिलिजन्सचे युनिट हेड सहायक निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांना बडतर्फ करण्यात आले होते. वाझे हे यातील प्रमुख आरोपी आहेत. गृहमंत्री देशमुख यांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावले आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले. हे गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत व त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल असे देशमुखांनी वांझेना सांगितल्याचा पत्रात उल्लेख आहे.

देशमुख त्यांच्या निवासस्थानी पोलीस अधिकार्ऱ्यांना बोलवायचे. सातत्याने पोलिसांना सुचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात निर्देश द्यायचे. हा सर्व प्रकार अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आला होता. असेही या पत्रात म्हंटले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

देशमुखांचा राजीनामा ते …

१८ मार्चला एका मराठी दैनिकाच्या सोहळ्यामध्ये परमबीर सिंग यांच्या नेतृत्वामध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची बदली केल्याचे वक्तव्य तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते.

२० मार्चला परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले त्यानंतर ५ एप्रिलला अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात १० मेला ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध ईसी आयआर दाखल केला. त्यानंतर देशमुख यांना ईडीने २६ जूनला पहिले समन्स पाठवले. त्यानंतर २९ जूनला दुसरे, ५ जुलैला तिसरे आणि १६ जुलैला चौथे तर १७ ऑगस्टला पाचवे समन्स पाठवले होते.

देशमुख यांनी २ सप्टेंबरला समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केली.
पण २९ ऑक्टोबर हि याचिका फेटाळली.
त्यानंतर आता १ नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात देशमुख स्वतःहून हजर झाले.
त्यानंतर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं त्यांना अटक केली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Parambir Singh | parambir singhs letterbomb anil deshmukhs appearance ed what happened today

 

हे देखील वाचा :

Winter Health Care | हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर आवश्य फॉलो करा ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना भेट, सरकारने वाढवला महागाई भत्ता

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप

 

Related Posts