IMPIMP

Pimpri Wakad Police | पिंपरी : भाऊसाहेब बेदरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांकडून एकाला अटक

by sachinsitapure

पिंपरी :  Pimpri Wakad Police | आर्थिक विवंचनेतून‎ भाऊसाहेब भानुदास बेदरे (वय-43, रा. गुरुनानक नगर, थेरगाव, मूळ रा. बेदरवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी आठ वर्षाची मुलगी नंदिनी हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: किचनमध्ये गळफास (Suicide Case) घेऊन आत्महत्या केली (Hanging Case). हा प्रकार काळेवाडी येथे मंगळवारी (दि.19) पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला. बेदरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) एकाला अटक केली आहे.

सुनील कुवटे उर्फ रामराव कुयटे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजश्री बेदरे (वय 32, रा. गुरुनानक नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pimpri Wakad Police) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती भाऊसाहेब आणि आरोपी यांच्यात जागेचा व्यवहार झाला होता. जागेची विक्री केल्यानंतर त्याचे पैसे आरोपी सुनिल याने बेदरे यांना दिले नाहीत. याच कारणावरुन बेदरे यांनी मंगळवारी पहाटे आपल्या आठ वर्षाच्या मुलीचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर भाऊसाहेब यांनी किचन मधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री बेदरे या गावी गेल्या होत्या. सोमवारी रात्री त्या गावकडून निघाल्या.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्या शिवाजीनगर येथे आल्या. त्यांनी पतीला फोन करुन गाडी घेऊन येण्यास सांगितले.
मात्र, पती आले नसल्याने त्या घरी आल्या. त्यांवेळी घरात झोपलेल्या 15 वर्षाचा मुलगा आशिष याने घराचा दरवाजा उघडला.
राजश्री यांनी मुलीला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती उठली नाही. तसेच पती भाऊसाहेब यांनी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

भाऊसाहेब बेदरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी पोलीसांनी ताब्यात घेतली.
या चिठ्ठीत जागेच्या व्यवहारातील पैसे सुनील उर्फ रामराव याने दिले नसल्याने आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या
करत असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी सुनिल याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Pune Lonikand Crime | मुलीसोबत अश्लील चाळे, सावत्र बापाला लोणीकंद पोलिसांकडून अटक

Related Posts