पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | घरासमोर राहणार्या अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारजे येथील रामनगरमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police) तेथे राहणार्या एका 28 वर्षाच्या नराधमाला अटक (Pune Crime) केली आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
दरम्यान, वारजे पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी शनिवारी पोलिसांच्या तावडीतून नजर चुकवून पळून गेला आहे. याप्रकरणी या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. पोलिसांनी तातडीने या नराधमाला अटक केली आहे. वारजे पोलिसांनी या आरोपीला शुक्रवारी अटक केली होती. तो शनिवारी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला असून वारजे पोलीस तपास करीत आहेत.
आरोपीने शनिवारी पहाटे पोलिस ठाण्याच्या सर्वेलन्स रूममधून धूम ठोकली आहे.
त्यावेळी वारजे माळवाडी पोलीस झोपेत होते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Web Title : Pune Crime | criminal run away from warje malwadi police station
- Thane Crime | काळ्या जादूसाठी वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी ! पोलिसांचा क्लिनिकवर छापा, कथित ‘डॉक्टर’ महिलेसह 3 अटकेत
- Satara News | साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण
- Pre Wedding Shoot | लोणावळ्यात प्री-वेडिंग शूट करणं पडलं माहागत, ड्रोन शुटिंग चालकाला अटक