IMPIMP

Thane Crime | काळ्या जादूसाठी वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी ! पोलिसांचा क्लिनिकवर छापा, कथित ‘डॉक्टर’ महिलेसह 3 अटकेत

by nagesh
Thane Crime | 3 arrested for smuggling of wildlife and their remains

ठाणे : Thane Crime | काळ्या जादूसाठी वन्य जीवांच्या अवयवांची तस्करी करण्यात येते. समाजातील अंधश्रद्धेमुळे अशा तस्करीला खतपाणी मिळत आहे. असाच प्रकार कल्याण येथे समोर आला आहे. वन विभागाने गुरुवारी रात्री कल्याणमध्ये एका फ्लॅटमधील क्लिनिकवर छापा मारून एका कथित महिला डॉक्टरसह 3 जणांना अटक केली आहे. हे तिघेजण वन्यजीवांच्या अवयवांची ऑनलाईन खरेदी-विक्री करत होते. तिघांकडून 250 इंद्रजाल आणि 50 हातजोड्या जप्त (Thane Crime) करण्यात आल्या.

क्लिनिकमधून खुलेआम करत होते विक्री

वनविभाग आणि वन्यजीव अपराध ब्युरोच्या नवी मुंबईतील बेलापूर शाखेने कल्याण पश्चिम येथील मॅक्सी
ग्राऊंडजवळ नवएव्हरेट टॉवर, सी विंग, फ्लॅट 102/103 मधील शुभ संकेत वास्तू नाव असलेल्या क्लिनिकवर
छापा मारला.
येथून गीता आनंद जाखोटिया (47) या कथित डॉक्टरसह तिचे सप्लायर नवनाथ त्रंबक घुगे (30) आणि अक्षय
मनोहर देशमुख (22, रा. म्हारळ) यांना पोलिसांनी अटक केली.

Pre Wedding Shoot | लोणावळ्यात प्री-वेडिंग शूट करणं पडलं माहागत, ड्रोन शुटिंग  चालकाला अटक

अटक केलेल्या तिघांकडून 250 इंद्रजाल आणि 50 हातजोडी असे गौण वनोपज जप्त केले.
ही वन्यसंपत्ती वन्यजीव अधिनियम 1972 नुसार परिशिष्ट 1 मध्ये संरक्षित प्रजातीमध्ये असून तिची विक्री व अवैधरित्या जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे.

या तीन्ही तस्करांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (16), 9, 39, 51, 52 आणि 48 (अ) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी दिली, असे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर. एन. चन्ने यांनी सांगितले.

हातजोडी आणि काळ्या रंगाची जाळी म्हणजे इंद्रजाल हे सौभाग्य, संपत्ती, समृद्धी देते अशी अंधश्रद्धा आहे.
यापासून आयुर्वेदिक औषधेही बनवली जातात.
आयुर्वेदिक दुकाने, वास्तू पूजन आणि इतर पूजांसाठी लागणार्‍या वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये इंद्रजाल आणि हातजोडी विक्रीसाठी ठेवली जाते.
या वस्तू जवळ बाळगणे आणि त्यांची खरेदी-विक्रीस बंदी आहे.

या कारवाईचे समन्वयक वन्यजीव अपराध ब्युरो अर्थात डब्ल्यूसीसीबी रेजीनलचे उपसंचालक योगेश वरकड, ठाण्याचे उपवन संरक्षक गजेंद्र हिरे यांच्यासह कल्याण विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर. एन. चन्ने यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकणार्‍या पथकाचे नेतृत्व मानद वन्यजीव वॉर्डन आणि डब्ल्यूसीसीबी स्वयंसेवक सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी केले.

Web Title : Thane Crime | 3 arrested for smuggling of wildlife and their remains

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा 

Pre Wedding Shoot | लोणावळ्यात प्री-वेडिंग शूट करणं पडलं माहागत, ड्रोन शुटिंग चालकाला अटक

Fake Currency | नोटबंदी कुचकामी ! देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट; प. बंगाल, युपी, गुजरात आघाडीवर तर महाराष्ट्रातही Fake नोटांचे प्रकार वाढले

USB Cable Private Part | ‘वाढीव’ काम करताना 15 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगात अडकली USB केबल, करावे लागले ‘ऑपरेशन’

Related Posts