IMPIMP

Pune Crime | ‘राईड’ मारायला गेला तो परतलाच नाही; थेट शोरुममधून लाखाची मोटारसायकल घेऊन ठोकली धूम

by bali123
Pune Crime | Robbery ON Jangali Maharaj Road Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | दुचाकी घेण्यासाठी तो शोरुमला आला. त्याने एक मोटारसायकल पसंतही केली. त्यानंतर त्याने तेथील कर्मचार्‍यास गाडीची टेस्ट राइड मारुन परत येतो, असे सांगून गाडी घेऊन गेला. तो पुन्हा परतलाच नाही. शेवटी मोटारसायकलच्या वितरकाने पोलिसांकडे (Pune Crime) धाव घेतली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

 

सागर शिंदे असे नाव सांगणार्‍यावर स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शंकर शेठ रोडवरील (Shankar Seth Road, Pune) कोठारी हुंडाई शोरुममध्ये शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शोरुमच्या वतीने दर्शन मेहता यांनी फिर्याद दिली आहे. सागर शिंदे असे नाव सांगणारा एक तरुण शोरुममध्ये आला होता.
त्याने एक लाख रुपयांची केटीएम मोटारसायकल विकत घ्यायची असल्याचे सांगितले.
त्यानंतर गाडीची टेस्ट राइड मारुन परत येतो, असे म्हणून त्याने गाडी घेतली.
त्यानंतर तो परत न येता, गाडीचा अपहार करुन फसवणूक (Cheating Case, Pune) केली.
गुन्ह्याचा अधिक तपास स्वागरेट पोलिस (Pune Crime) करत आहेत.

Web Title :- Pune Crime | He went on a ride and never returned; Dhoom hit a motorcycle worth lakhs directly from the showroom-shankar seth road pune swargate police station marathi news sarkarsatta

Related Posts