IMPIMP

Pune Crime | पुण्यातील 9 जणांच्या कोयता गँगवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 78 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA Action on 9-member Koyata gang in sahakar nagar of Pune ! 78th action of Pune Police Commissioner Amitabh Gupta till date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात येत आहे. पुण्यातील (Pune Crime) सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी आदेश पांडुरंग बिरामणे (Aadesh Pandurang Biramane) याच्यासह त्याच्या 9 जणांच्या कोयता गँगवर (Koyata Gang) पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 78 आणि चालु वर्षात 15 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action On Criminals)

 

टोळी प्रमुख आदेश पांडुरंग बिरामणे (वय-24 रा. दुर्गा सोसायटी, धनकवडी-Dhankawadi), साथीदार संदीप सोमनाथ शेंडकर Sandeep Somnath Shendkar (वय-23 रा. बालाजीनगर, धनकवडी), सलमान उर्फ सल्या हमीद शेख Salman alias Salya Hameed Sheikh (वय-23 रा. बालाजीनगर, धनकवडी), आफान बशिर शेख Afan Bashir Sheikh (वय-20 रा. गुलमोहर अपार्टमेंट, धनकवडी), सौरभ शिवाजी भगत Saurabh Shivaji Bhagat (वय-23 रा. हेरंब अपार्टमेंट, धनकवडी), ऋषिकेश/सनी अनिल शिंदे Rishikesh / Sunny Anil Shinde (वय-21 रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी), सुफियान बशिर शेख Sufian Bashir Shaikh (वय-19 रा. बालाजीनगर, धनकवडी), राजकुमार शामलाल परदेशी Rajkumar Shamlal Pardeshi (वय-23 रा. रजनी कॉर्नरजवळ, धनकवडी) तसेच दोन विधीसंघर्षित बालकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

आरोपी आदेश बिरामणे आणि त्याच्या 9 साथीदारांवर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), अपहरण (Kidnapping), जबरी दुखापत करुन दरोडा (Robbery), दंगा, गंभीर दुखापत, लोकसेवकावर हल्ला किंवा फौजदारी बलप्रयोग करणे, तडीपार कालावधीत बेकायदेशीरपणे हद्दीत येणे तसेच लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर (Senior Police Inspector Savlaram Salgaonkar) यांनी स्वारगेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण (Swargate Division DCP Sushma Chavan) व पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने
आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आर. एन राजे (ACP R. N. Raje) करीत आहेत.

 

आयुक्तांची 78 वी मोक्का कारवाई

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व
मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर
मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 78 तर चालु वर्षात
15 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सुषमा चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी केली.

Web Title : Pune Crime | MCOCA Action on 9-member Koyata gang in sahakar nagar of Pune ! 78th action of Pune Police Commissioner Amitabh Gupta till date

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

ERSS Police New Helpline Number | आता लवकरच 100 नाही तर 112 नंबरवर पोलिसांची मदत मिळणार

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा 11 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार

Pune Crime | वखार महामंडळाचा विश्वासघात ! एकाचवेळी कायम आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून हजेरीपत्रकात केल्या सह्या; स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts