IMPIMP

Pune Crime | खेड शिवापूर येथील पेट्रोल पंपावर दरोडा

by nagesh
Pune Crime | petrol pump robbery workers were beaten with sticks incident was caught on cctv

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | पुणे सातारा रोडवरील खेड शिवापूर येथील पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खेड शिवापूर भागात वेळू गावात श्रीराम पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार दोन चोरटे आले. त्यांनी पंपावरील कामगारांना कोयत्याचा धाक दाखवून २१ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. चोरटे पुण्याच्या दिशेने पळून गेले. पेट्रोल पंपाचे मालक तुषार जगताप यांनी राजगड पोलीस ठाण्यात मध्यरात्री फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

 

Web Title :- Pune Crime | petrol pump robbery workers were beaten with sticks incident was caught on cctv

 

हे देखील वाचा :

GST | दुकानदारांसाठी महत्वाची बातमी! 31 डिसेंबरपूर्वी करा हे काम अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

Ram Setu | रामसेतू खरेच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्री संसदेत म्हणाले…

Pune Crime | वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ जादूटोणा करणार्‍या दोघा तृतीयपंथींना अटक; पुण्यात एकच खळबळ

 

Related Posts