IMPIMP

Pune Crime | अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय..! पैसे पाठव, पोलिसांना गंडा घालणारा गजाआड

by nagesh
CP Krishna Prakash | Action taken by Commissioner of Police IPS Krishna Prakash!senior police inspector who ignored the complaint attached to control room and an employee who collected the installment

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनमी अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची बातमी देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव (Goregaon) येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खलीलुल्ला अयनुल्ला खान (Khalilullaha Aiyanulla Khan) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलीस नियंत्रण कक्षात (Police Control Room) फोन करुन ‘मी विजयसिंग अहमदाबाद पोलीस आयुक्त (Vijay Singh Ahmedabad CP) बोलतोय, आपल्या आयुक्तांचा नंबर द्या’ असा फोन आल्याने नियंत्रण कक्षातील पोलिसांनी पोलीस आयुक्तांचा नंबर दिला. त्यानंतर आरोपीने पुन्हा फोन करुन आयुक्तांना वारंवार फोन करत आहे. मात्र, ते माझा फोन उचलत नसल्याचे सांगून पिंपरी चिंचवडमध्ये पिस्टलाची डिल (Pistol Deal) करणाऱ्यांची माहिती देयची असल्याचे सांगून गुन्हे शाखेच्या (Crime Branch DCP) पोलीस आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त (ACP), पोलीस निरीक्षकांचे फोन नंबर मागितले. त्यानुसार नियंत्रण कक्षातून आरोपीला फोन नंबर देण्यात आले.(Pune Crime)

 

त्यानंतर आरोपीने पुन्हा नियंत्रण कक्षात फोन करुन आयुक्त फोन उचलत नसल्याचे सांगितल्याने त्याला सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Police Inspector Devendra Chavan) आणि सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे (PSI Dr. Ashok Dongre) यांचा नंबर देण्यात आला. आरोपीने डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता डोंगरेंनी पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे (PSI Pradipsingh Sisode) यांचा नंबर दिला. आरोपीने सिसोदे यांना संपर्क करुन आपण पोलीस आयुक्तांचा व पोलिसांचा गुप्त बातमीदार बोलत असल्याचे सांगून पिंपरी चिंचवडमध्ये 4 ते 5 पिस्टलची विक्री होणार असल्याचे सांगून त्यांना फोटो आणि विक्री करणाऱ्याचे खोटे फोटो पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 15000 हजार रुपयांची मागणी करुन Khalilullaha Aiyanulla Khan नावाचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) खाते नंबर, बँक डिटेल्स पाठवले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, आरोपीने पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना वारंवार फोन केला. त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करुन एक पथक गोरेगाव येथे पाठवले. पोलिसांनी आरोपीला बोलण्यात गुंतवून ठेवून त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रथम 15 आणि नंतर 9 हजार असे एकूण 24 हजार रुपये पाठवून गोरेगाव येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपीने मलाड पोलीस स्टेशन (Malad Police Station), गोरेगाव पोलीस स्टेशन (Goregaon Police Station) आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

 

आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत
आरोपी ऑनलाईन पद्धतीने पोलीस नियंत्रण कक्षाचे फोन नंबर प्राप्त करत होता.त्यानंतर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर घेत होता. त्यांच्याशी संपर्क साधून पिस्टल संदर्भात काम असल्याची खोटी बतावणी करुन तुमच्या अधिपत्याखाल काम करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांचे नंबर द्या मी त्यांना आरोपींना पकडून देतो असे सांगत होता. त्यानंतर दुय्यम पोलिसांना फोन करुन खोटे फोटो पाठवून पोलिसांकडून 10 ते 15 हजार रुपयांची मागणी करत होता. पैसे मिळाल्यानंतर पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन काम पुढे ढकलले असल्याचे सांगून फोन बंद करत होता. आरोपी 2015 पासून असे गुन्हे करत होता.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हण यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad police station) फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील (Police Inspector Kishor Patil) करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त गुन्हे काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole),
सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे,
सहायक पोलीस निरीक्षक सागर पाननंद (API Sagar Pannand), पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंह सिसोदे,
धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र घनवट, विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट,
नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, नितेश बिच्चेवार, नागेश माळी,
भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, सोनाली माने, अमोल साडेकर, सुमित डमाळ, अमोल शिंदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pimpri Chinchwad Police Arrest one in case of cheating

 

हे देखील वाचा :

Earn Money | 5000 रुपये खर्च करून घरबसल्या कमवा लाखो रुपये महिना, ताबडतोब जाणून घ्या पद्धत

Anil Deshmukh Money Laundering Case | अनिल देशमुख मुख्य आरोपी ! मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ED कडून 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

7th Pay Commission | नवीन वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळेल भेट, 26 हजार रुपये होऊ शकतो किमान पगार; जाणून घ्या

 

Related Posts