IMPIMP

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं

by nagesh
Pune Crime | six day old baby born from a relationship with a cousin dumped in tamhini ghat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ पुण्यातील (Pune Crime) ताम्हिणी घाटात फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चुलत भावाशी आलेल्या शरीर संबंधातून जन्माला आलेले बाळ नातेवाईकांच्या दबावामुळे घाटात फेकून दिल्याची घटना घडली. ज्याच्यापासून बाळ झाले त्यानेच हे 6 दिवसांचे बाळ फेकून दिलेय. आता पोलीस (Pune Police) आणि ट्रेकर्सच्या (Trekkers) मदतीने त्या बालकाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, बाळाची आई मंगल पवार (Mangal Pawar) ही पुण्यातील घोटवडे भागात गोडांबेवाडी (Godambewadi) गावात मजुरी करते. तिच्या पतीचे निधन झाले असुन पहिल्या पतीपासून तिला 1 मुलगी आहे. मात्र गोडांबेवाडीत मंगलच्या सोबतच मजुरी करणाऱ्या सचिन चव्हाण (Sachin Chavan) या चुलत भावाशी तिचे शारीरिक संबंध आले. त्या संबंधातून तीला मुलगा झाला. परंतु, ही गोष्ट तिच्या कुटुंबाला सहन झाली नाही. (Pune Crime)

दरम्यान, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील असणारे चव्हाण कुटुंब 5 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला जायचे आहे असं सांगून मंगल पवारला कारमधे घेऊन तिचे चुलत भाऊ संजय चव्हाण (Sanjay Chavan), नितिन चव्हाण (Nitin Chavan), अजय चव्हाण (Ajay Chavan) आणि सचिन चव्हाण (Sachin Chavan) हे निघाले होते. पण, ताम्हीणी घाटातील दरी पुलाजवळ गाडी आली असता ज्याच्यापासून बाळ झाले होते त्या सचिन चव्हाणने मंगल पवारच्या हातातून बाळ खेचून घेतले आणि ते दरीत फेकुन दिले.

या दरम्यान मंगल पवार आणि त्यांच्या मुलीला कारमध्ये लॉक करुन ठेवले होते.
मंगल पवारने घोटवड्याला परत आल्यानंतर या घटनेबाबत पोलिसांत तक्रार केली. यानंतर बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

Web Title :- Pune Crime | six day old baby born from a relationship with a cousin dumped in tamhini ghat

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

How To Increase CIBIL Score | ‘सिबिल स्कोर’ वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा; कर्ज मिळवण्यासाठी कुठलीही येणार नाही अडचण, जाणून घ्याPune Crime | शेअरमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

Shivaji Adhalarao Patil | आढळरावांचं खा. अमोल कोल्हेंना आव्हान; म्हणाले – ‘बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या बारीत घोडीवर बसण्याचा शब्द पाळा’

Pune Crime | शेअरमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

Related Posts