IMPIMP

Pune Cyber Crime | आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून व्यावसायिकाला 1 लाखांचा ऑनलाईन गंडा

by nagesh
Pune Cyber Crime | A new face of cyber thieves; Sending a mobile and asking to fill in the information in the app Fraud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Cyber Crime | आर्मीची ऑर्डर (Army Order) असल्याचे सांगून १ रुपया पाठविल्यावर २ रुपये तुम्हाला परत मिळतील, असा बहाणा करुन एका तरुण व्यावसायिकाला आर्मीच्या (Army) नावाखाली सायबर चोरट्यांनी (Cyber Thief) तब्बल २ लाख रुपयांना गंडा घातला. (Pune Cyber Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी धनकवडीतील (Dhankawadi) एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फिशचा व्यवसाय (Business) आहे. त्यांना एका मोबाईलवरुन फोन आला. आम्ही खडकी (Khadki) मधील लष्कराचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांचे मर्चंटचे अकाऊंट आहे. त्यात अगोदर पैसे पाठवावे लागतात. त्यानंतर तुमची ऑर्डर पोहचल्यावर दुप्पट पैसे मिळतात. तुम्ही एक रुपया पाठविल्यावर २ रुपये तुम्हाला परत मिळतील, असे सांगितले. (Pune Cyber Crime)

 

फिर्यादी यांना त्यांनी लष्करी गणवेशातील फोटो, आधार कार्ड पाठविले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला क्युआर कोड पाठवून तो स्कॅन करायला लावला. त्यावरुन त्यांनी १९ हजार ३१ हजार, ४९ हजार ९९५ आणि ९९ हजार ९९९ असे सर्व मिळून १ लाख ९९ हजार ९९४ रुपये ऑनलाईन पद्धतीने पाठविले. मात्र त्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले नाही. आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) तक्रार दिली. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन हा गुन्हा (FIR) भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | 1 lakh online fraud to a businessman claiming to have an Army order

 

हे देखील वाचा :

OBC Reservation Maharashtra | SC ने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर ठाकरे सरकारने निवडणुकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय !

SBI Tax Savings Scheme | SBI च्या ‘या’ स्कीममध्ये केवळ रू. 1000 पासून करा गुंतवणूक; टॅक्स सूटसह मिळतील अनेक फायदे

Nawab Malik | …म्हणून नवाब मलिकांच्या ED कोठडीत वाढ

Bogus Aadhaar Card | काय सांगता ! होय, राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस

 

Related Posts