IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : होळीनिमित्त आयोजित ‘रंग बरसे’ कार्यक्रमात दोन गटात राडा, आयोजकांवर गुन्हा दाखल

April 2, 2024

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | होळीनिमित्त (Holi 2024) आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग बरसे’ (Rang Barse) कार्य़क्रमात दोन गटात तुफान राडा झाला. कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांनी एकमेकांना बिअरच्या बाटल्या फेकून मारल्या. यामध्ये एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार 25 मार्च रोजी दुपारी साडेचार ते पाच या वेळेत थरमॅक्स चौकातील वुई हॉटेलमध्ये (WE Hotel Chinchwad) घडला.

याबाबत जखमी मुलीच्या आईने सोमवारी (दि.1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन रंग बरसे या इव्हेंटच्या आयोजकांसह दोन गटातील दोन ते तीन जणांवर आयपीसी 337, 338, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील वुई हॉटेल येथे ‘रंग बरसे’ या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी फिर्य़ादी यांची मुलगी व तिची मैत्रिण गेली होती. कार्यक्रमादरम्यान दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन ते तीन जणांनी बियरच्या बाटल्या एकमेकांच्या दिशेने फेकून मारल्या. बियरच्या बाटल्यांच्या काचा फिर्यादी यांच्या मुलीच्या दोन्ही पायांना लागल्याने ती गंभीर जखमी झाली.

रंग बरसे या इव्हेंटच्या आयोजकांकडून कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला व लहान मुलांच्या सुरक्षेची कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच कार्यक्रमात दारू विक्री व दारू पिण्यास दिली जाणार नाही, असे फिर्यादीला सांगण्यात आले असताना तेथे लोकांना दारू व बियर पिण्यासाठी देण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.

Pune Kondhwa Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचे नराधम बापाकडून लैंगिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल