IMPIMP

Pune Swargate Crime | अपघाताचे कारण सांगून तरुणाला लुटले, लक्ष्मीनारायण चौकातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Swargate Crime | दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले. दारु पिऊन गाडी चालवतो का तुझ्यामुळे आमचा अपघात झाला असता, असे म्हणत तरुणाच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने (Chain Snatching) हिसकावून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.18) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनारायण (Laxminarayan Talkies Pune) चौकातील पुलावर घडली. (Pune Robbery Case)

याबाबत शुभम अरुण रोकडे (वय-24 रा. डॉल्फिन चौक, बनकर शाळेजवळ, अप्पर बिबवेवाडी) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दोन दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांविरुद्ध आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरुन लक्ष्मीनारायण चौकातील ब्रिजवरून जात होते. शुभम रोकडे ब्रिजच्या मधोमध आला असता पाठीमागून दोन दुचाकीवरुन चारजण आले.(Pune Swargate Crime)

दुचाकीवरील चौघांनी शुभम याची गाडी आडवली. तु दारु पिऊन गाडी चालवतो का अशी विचारणा करुन तुझ्यामुळे
आमचा अपघात झाला असता असा आरोप केला. तर दुचाकीवरील एकाने शुभमला जवळ ओढून त्याच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी यु-टर्न घेऊन पुलावरुन विरुद्ध बाजूने कात्रजच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले (PSI Ashok Yewale) करीत आहेत.

Pune Rape Case | पुणे : इन्स्टाग्रामवर झाली ओळख, लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

 

Related Posts