IMPIMP

Solapur Crime | बँकेच्या कस्टमर केअरनेच ग्राहकाला घातला सव्वा दोन लाखाचा गंडा

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

सोलापूर :  सरकारसत्ता ऑनलाइनSolapur Crime | ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, बँकेच्या कस्टमर केअरला (Bank Customer Care) फोन केल्यानंतर तेथील व्यक्तीने ग्राहकास बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून ओटीपी नंबर (OTP Number) घेऊन त्यांच्या बँक खात्यासह क्रेडिट कार्डवरुन (Credit Card) सुमारे 2 लाख 27 हजार रुपये काढून घेतल्याची घटना सोलापूर येथे (Solapur Crime) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

संबंधित ग्राहकाने ट्रॅक्टरच्या कर्जाचा हफ्ता खात्यातून का गेला नाही याची चौकशी करण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला होता. चौकशीच्या नादात सव्वा दोन लाख रुपये गमवावे लागल्याने कस्टमर केअरच्या विश्वासर्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बजरंग सोपान हिप्परकर Bajrang Sopan Hipperkar (राजुजारपूर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बजरंग हिप्परकर यांना ट्रॅक्टर विकत घ्यायचा होता.
त्यामुळे त्यांनी करगणी (ता. आटपाडी) येथील आयसीआयसीआय बँकेकडून (ICICI Bank) कर्ज घेतले.
सहामाही हप्त्यातून कर्जाची परतफेड ते करत होते.
5 फेब्रुवारीला कर्जाचा हप्ता न गेल्याने त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधून त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. (Solapur Crime)

त्यावेळी फोनवरील व्यक्तीने त्यांना प्ले-स्टोअरमधून (Play Store) एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानुसार हिप्परकर यांनी ते ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्या व्यक्तीने विशिष्ट सूचना करून त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांना तुम्ही आमच्या सूचनांचे पालन केल्यानंतर हप्त्याची रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा होईल, असा विश्वास दिला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यानंतर त्यांच्या सेव्हिंग खात्यासह (Savings Account) क्रेडिट कार्डवरून नऊ वेळा सुमारे 2 लाख 27 हजार 313 रुपये फसवणूक करून काढून घेतले.
काही वेळानंतर हिप्परकर यांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे.
त्यानंतर त्यांनी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कस्टमर केअरचा दुसरा नंबर देऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले.
हिप्परकर यांनी तेथे तक्रार दिली तसेच पोलीस ठाण्यातही (Police Station) तक्रार दिली आहे.

 

Web Title :- Solapur Crime | online fraud from customer care robbed the customer 2 lakh in solapur

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘थांब तुला खल्लास करतो’ म्हणत तरुणावर केला ‘बुछूट’ गोळीबार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुढील वर्षी लाँच होईल भारताचा Digital Rupee, ट्रेडिशनल करन्सीपेक्षा वेगळे नसेल; जाणून घ्या

Pune Political News | कुटुंब कलह की कुटुंबातील आणखी एक सदस्य महापालिकेत पाठविण्यासाठी केलेली ‘तडजोड’? राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts