IMPIMP

Photos : अनन्या पांडेनं सांगितला बॉडी शेमिंगची अनुभव, म्हणाली – ‘लोक बोलायचे ‘तू मुलासारखी दिसतेस, तू फ्लॅटस्क्रीन आहेस’

by bali123
ananya panday recalls being body shamed flatscreen entering bollywood

 सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस अनन्या पांडे (Ananya Panday) अनेकदा आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसली आहे. बोल्ड फोटो आणि हॉटनेसंमुळं अनन्यानं खूपदा अटेंशन घेतलं आहे. सोशलवर ती कामयच ॲक्टीव्ह असते. अनन्यानं नुकताच खुलासा केला आहे की, ती बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. जेव्हा ती इंडस्ट्रीत आली नव्हती, तेव्हाची ही गोष्ट आहे असंही तिनं सांगितलं आहे.

‘तू मुलासारखी दिसतेस, तू फ्लॅटस्क्रीन आहेस’
एका मुलाखतीत अनन्या Ananya Panday त्या गोष्टीचा खुलासा केला आहे जेव्हा ती पहिल्यांदा ट्रोल झाली होती. अनन्या म्हणाली, मला ती तारीख आणि वेळ नीट आठवत नाही. त्या दिवसात माझ्या आईवडिलांसोबत एक फोटो असायचा. तेव्हा मी ॲक्ट्रेस नव्हते. तेव्हा मी लहान होते. मी आईवडिलांसोबत बाहेर जायचे. लोक माझी खूप थट्टा करायचे. तू मुलासारखी दिसतेस. तू फ्लॅटस्क्रीन आहेस. अशा अनेक अश्लील कमेंट केल्या जात होत्या.

‘मी माझा आत्मविश्वास गमवायला लागले होते’
पुढं बोलताना अनन्या म्हणाली, या गोष्टीमुळं मला खूप दु:ख व्हायचं. कारण यामुळं मी माझा आत्मविश्वास गमवायला लागले होते. असं झालं तर तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवायला संकोच करता असंही तिनं सांगितलं.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका सिनेमात अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. लायगर असं या सिनेमाचं नाव आहे. इतकंच नाही तर ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत. अनन्यानं स्टुडेंट ऑफ द ईयर 2, पती पत्नी और वो, खाली पीली अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

भारत पाकिस्तानला देणार ‘कोरोना’ लशीचे डोस; कंगना रणौत म्हणाली- ‘आता तिथंही भाजपचं सरकार’

Related Posts