IMPIMP

FIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल

by nagesh
FIR On Sahil Khan | case has been registered against actor sahil khan for allegedly instigating manoj patil attempt suicide

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – FIR On Sahil Khan | मिस्टर इंडिया पुरस्कार विजेता बॉडी बिल्डर मनोज पाटील (Body Builder Manoj Patil) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खान (FIR On Sahil Khan) आणि इतर तिघांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात (oshiwara police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांत मनोज पाटील याने भाग घेतला आहे. काही दिवसापासून मिस्टर ऑलिम्पियासाठी मनोज पाटील प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. मात्र, साहिल (FIR On Sahil Khan) आपण या स्पर्धेत उतरू नये यासाठी प्रयत्न करत होता असा आरोप मनोज पाटीलने केला आहे. व्यावसायिक तसेच इतर वादही दोघांमध्ये होते. याशिवाय साहिल खान सोशल मीडियावर आपली बदनामी करत होता या सर्व गोष्टींमुळे मनोजने बुधवारी विषारी गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, साहिलकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मनोजने व्हीडिओ शेअर केले होते.
त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं होते.
मनोजवर कपूर रुग्णलयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, मनोजच्या कुटूंबियांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार मनोज पाटीलला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- FIR On Sahil Khan | case has been registered against actor sahil khan for allegedly instigating manoj patil attempt suicide

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नाव नाही?; सचिन वाझेसह 14 आरोपी

Mumbai Crime | वयोवृद्ध आईवडिलांची छळवणूक ! मुलाला 10 दिवसात अलिशान घर सोडण्याचे कोर्टाचे निर्देश

LIC Saral Pension Yojana | केवळ 1 वेळा प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळतील 12000 रुपये, LIC च्या ‘या’ प्लानमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

Related Posts