IMPIMP

Neeraj Chopra | नीरज चोप्रासाठी केलेल्या ट्वीटमुळे ‘बिग बीं चांगलेच चर्चेत, ‘या’मुळे होतायेत ट्रोल

by nagesh
Neeraj Chopra | big big amitabh bachchan troll on tweet for neeraj chopra write wrong population

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Neeraj Chopra | टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलेल्या भालाफेक नीरज चोप्रासाठी (Neeraj Chopra) बॉलिवूडचे बिग बी (Big B. Tweet) म्हणून ओळखणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक ट्विट केलं होतं. बिग बींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नीरजचे कौतुक केलं होतं. हे केलेलं ट्विट त्यांनी  ट्विटर आणि इन्स्टाग्रामला शेअर देखील केलं आहे. मात्र या ट्विटमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. या ट्विटमुळे  बिग बींना ट्रोल (Troll) करण्यात येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

बिग बींनी (Big B.) व्हिडिओ शेअर करत असताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनमध्ये एक मोठी चूक केली आहे.
यावरून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या दमदार खेळाने 103 कोटी
लोकांची छाती गर्वाने फुगलीय. भारतीय ऑलिम्पिक टीमने जगभरात देशाचा झेंडा फडकवत देशाची मान उंचावलीय. या पद्धतीची ट्विट पोस्ट (व्हिडिओ) त्यांनी केली आहे. त्यामुळे भारताची लोकसंख्या आकडेवारी चुकीची दिल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

 

दरम्यान, सध्या भारताची लोकसंख्या 130 कोटींहून जास्त आहे. अशातच त्यांनी लोकसंख्या लिहिताना
चूक केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यांच्या या शेअर केलेल्या पोस्टवरून एका
युजरने कंमेंट केली आहे की, ‘103 करोड. हे ज्ञान कोणत्या यूनिवर्सिटीमधून मिळवलंय. आंधळ्या भक्तीमध्ये २७ कोटी जनतेला नायजेरियाला पाठवलंत का काका?” तसेच, दुसऱ्या एका उजरने म्हटलं आहे की, सरांना माहितेय भारतीय केवळ 103 करोडच आहेत.”याबाबत त्यांना ट्रोल केलं जात आहे.

 

Web Title : Neeraj Chopra | big big amitabh bachchan troll on tweet for neeraj chopra write wrong population

 

हे देखील वाचा :

Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 % पर्यंत होणार कपात, जाणून घ्या

Pimpri Crime | लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टोळक्याकडून 25 वर्षीय तरुणाची हत्या, माजी शहराध्यक्षासह दोघा जणांना अटक

MRNA Vaccine | खूशखबर! कोविडसाठीची एमआरएनए लस कॅन्सरवरही उपयोगी; जर्मन बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोनटेकचे संशोधन

 

Related Posts