IMPIMP

Salman Khan | एयरपोर्टवर सलमान खानला रोखण्याच्या प्रकरणात देशातील 2 प्रमुख वृत्तपत्र ‘गोत्यात’, फेक न्यूज पसरवण्याचा आरोप; आता CISF ने स्वत: सांगितले ‘सत्य’

by nagesh
Salman Khan | in the case of stopping salman khan at the airport cisf clarification

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Salman Khan | काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रातून वृत्त समोर आले होते की, बॉलीवुड अभिनेता सलमान खान (Salman Khan) चित्रपट टायगर 3 (film Tiger 3) च्या शूटिंगसाठी जेव्हा रशियाला निघाला होता, तेव्हा त्यास विमानतळावर एका CISF जवानाने आवश्यक चेकअपसाठी थांबवले होते. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर वायरल होत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या व्हिडिओवरून पुढील माहिती अशी समोर आली की, असे केल्याने त्या जवानाला दंड करण्यात आला. याबाबत देशातील दोन प्रमुख वर्तमानपत्रांनी सुद्धा वृत्त दिले की, एयरपोर्ट (airport) वर सलमानला रोखणार्‍या जवानावर कारवाई झाली आहे.
मात्र आता CISF च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या प्रकरणात सत्य सांगण्यात आले आहे.

 

 

CISF ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ट्विटमध्ये लिहिलेला मजकूर चुकीचा आणि निराधार आहे.
सत्य हे आहे की, संबंधित अधिकार्‍यांनी संपूर्ण निष्ठेने कर्तव्य पार पाडणार्‍या जवानाला योग्य प्रकारे पुरस्कृत केले आहे.

 

 

द न्यू इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले होते की, सीआयएसएफ जवानाने एका मीडिया हाऊसची चर्चा केल्याने त्या जवानाचा फोन जप्त करण्यात आला.
वेबसाइटसोबत बोलताना एका दुसर्‍या जवानाने सांगितले की, ओडिसाच्या एका मीडिया हाऊसशी बोलल्याने सोमनाथ मोहंती (Somnath Mohanty) चा फोन जप्त करण्यात आला आहे.
असे करणे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे.

 

 

उलट त्यांना ताकिद देण्यात आली होती की, सलमान खानच्या बाबतीत त्यांनी कोणत्याही मीडिया हाऊसशी बोलू नये.
मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, त्या जवानावर कारवाई केली नसून त्यास पुरस्कृत करण्यात आले आहे.

 

Web Title : Salman Khan | in the case of stopping salman khan at the airport cisf clarification

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! नशेचे इंजेक्शन देऊन ‘मॉडेल-रॅपर’कडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्याच्या हिंजवडीतील घटना

High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट

Narayan Rane | शिवसेना आमदारचं वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढतो’ (व्हिडीओ)

 

Related Posts