IMPIMP

Narayan Rane | शिवसेना आमदारचं वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढतो’ (व्हिडीओ)

by nagesh
Narayan Rane | shiv sena mla santosh bangar makes controversial statement about bjp leader narayan rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राणेंना (Narayan Rane) कालच अटक करण्यात आली. त्यांनतर राज्यात अनेक ठिकाणी वातावरण चांगलंच तप्त झालं होतं. या नाट्य घडामोडीनंतर राणेंना अखेर रात्री उशिरा न्यायालयाने दिलासा दिला. राणेंना जामीन (Bail) मंजूर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. यांनतर भाजप आणि शिवसेना (Shiv Sena BJP) हे दोन्ही पक्ष परस्परावर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केलीय. आता मात्र हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी नारायण राणेबाबत वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राणेंनी (Union Minister Narayan Rane) केलेल्या वादग्रस्त विधानावरून काल राज्यात अनेक जिल्ह्यात शिवसैनिक (Shiv Sainik) आक्रमक झाले होते.
काही ठिकाणी सेना भाजप (Shiv Sena BJP) आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
तसेच, यावरून हिंगोलीत नारायण राणेंचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात लटकवून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली. या दरम्यान, शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत नारायण राणेंचा निषेध देखील केला आहे.
यावेळी राणेंवर टीका करताना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांची जीभ घसरली आहे, बांगर यांनी नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केलाय.

 

 

काय म्हणाले संतोष बांगर?

टीका करत असताना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) म्हणाले की, ‘अरे तू काय सांगतो, कुठं यायचं कुठं यायचं.
तुझ्या घरात घुसून तुला मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझा पोलीस बंदोबस्त थोडा बाजूला करा.
हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन चारीमुंड्या चीत करेल.
तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही,’ असं वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधान आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राणेंची तुलना कुत्र्याशी करत भाजपलादेखील इशारा दिला आहे.
राणेला कोकणातल्या लोकांनी नाकारलं. मुंबईत त्याला मतदारांनी नाकारलं.
मात्र भाजपनं फक्त इतरांवर भुंकण्यासाठी त्यांना जवळ केलंय.
इतरांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपनं त्यांना सोबत घेतलंय.
पण जो कधीच कुणाचा झाला नाही, तो भाजपचा तरी काय होणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Narayan Rane | shiv sena mla santosh bangar makes controversial statement about bjp leader narayan rane

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भादलवाडीमध्ये गळा चिरुन तरुणाचा खुन

Chhagan Bhujbal | भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटींची मालमत्ता जप्त’

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

 

Related Posts