IMPIMP

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

by pranjalishirish
taarak-mehta-ka-ooltah-chashmah-rita-reporter-aka-priya-ahuja-poses-in-a-bikini-see-viral-photos

टीव्ही सिरीयल तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा (Priya Ahuja) सध्या चर्चेत असल्याचं दिसत आहे. तुम्हाला वाटत असेल की याचं कारण मालिका आहे तर असं अजिबात नाही. तिच्या चर्चेत येण्याचं कारण आहे तिचा बोल्ड बिकिनी अवतार आणि तिची पोस्ट. खास बात अशी तिनं या बिकिनी फोटो शेअर करताना परफेक्ट बॉडी आणि स्ट्रेच मार्कबद्दल खास गोष्टी सांगितल्या आहेत.

प्रियानं Priya Ahuja तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती बोल्ड बिकिनीत दिसत आहे. पोस्ट शेअर करताना तिनं बॉडी शेमिंग आणि स्ट्रेचमार्कर लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

प्रिया Priya Ahuja आपल्या पोस्टमध्ये लिहिते, आता माझ्याकडे आधीसारखी परफेक्ट बॉडी नाहीये. माझ्या शरीरावर खूप सारे स्ट्रेच मार्क आहेत. माझी स्कीन लुज झाली आहे. आणि मी थोडी जाडही झाले आहे. पण यात मी खुश आहे.

प्रिया पुढं म्हणते, मला माझ्या बॉडीवर आताही गर्व आहे. कारण मी नव्या आयुष्याला जन्म दिला आहे. माझं पोट त्या नव्या आयुष्याचं 9 महिने घर होतं. माझ्या शरीरानं त्याची काळजी घेतली. प्रेग्नंसी नंतर शरीर एकदम बदललं. डिलीव्हरीच्या दीड वर्षांनंतर माझी बॉडी पूर्ण रिकव्हर होऊ शकली नाही. परंतु मला वाटतं मी आताही सुंदर आहे.

फोटोत प्रिया Priya Ahuja पती मालव राजदा सोबत समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा मुलगाही सोबत आहे. 1 नोव्हेंबर 2019 रोजी तिनं अरदास याला जन्म दिला होता. बिकिनीत प्रिया खूपच हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CL3br6ipqsq/

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts