IMPIMP

Bank Locker Rules | एखाद्या बँकेत नसेल अकाऊंट तरीसुद्धा मिळेल लॉकरची सुविधा, RBI ने नियमांमध्ये केला बदल; जाणून घ्या

by nagesh
Bank Locker Rules | bank locker rules changed banks to pay 100 times of locker rent as penalty

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Bank Locker Rules | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलिकडेच बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार्‍या सेफ डिपॉझिट लॉकर आणि सेफ कस्टडी आर्टिकल सुविधांबाबत नवीन नियम (Bank Locker Rules) जारी केले आहेत. यासाठी आरबीआयने बँकिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये बदल, कस्टमर्सच्या तक्रारी आणि बँकांसह इंडियन बँक असोसिएशन (IBA) च्या सूचना लक्षात घेतल्या आहेत.

नवीन नियमानुसार, जर तुमच्या एखाद्या बँकेत कोणताही व्यवहार नसेल तरीसुद्धा लॉकर (Bank Locker) सुविधा दिली जाऊ शकते. आरबीआयचे नवीन निर्देश 2022 पासून लागू होतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

लॉकर घेतेवेळी बँक घेऊ शकतात टर्म डिपॉझिट

बँकांसमोर अशी अनेकदा स्थिती येऊ शकते की, एखादा ग्राहक लॉकर ऑपरेट करत नाही आणि रेंट सुद्धा भरत नाही.
अशावेळी लॉकर रेंट (Locker Rent) च्या पेमेंटसाठी बँक आता लॉकर अलॉटमेंटच्या वेळी
टर्म डिपॉझिट (Term Deposit) घेऊ शकते. हे तीन वर्षांचा रेंट आणि चार्जेसच्या बरोबरीने असेल.

 

 

बँकेचे दायित्व रेंटच्या 100 पट रक्कमेपर्यंत असेल

जर नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, विज पडणे, वादळ इत्यादीने नुकसान झाले तर भरपाई मिळणार नाही असे स्पष्ट नमूद करावे.
याशिवाय जर ग्राहकाच्या चुकीने लॉकरचे काही नुकसान झाले तरीसुद्धा बँक भरपाई करणार नाही.
परंतु बँकेला हे ठरवावे लागेल की, बँकेच्या इमारतीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही
अणि सुरक्षेची व्यवस्था चोख करावी.
बँकेत आग लागणे, चोरी होणे, इमारत कोसळणे, कर्मचार्‍याकडून फसवणूक इत्यादी स्थितीत बँकेला ग्राहकांना त्यांच्या लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट भरपाई द्यावी लागेल.
म्हणजे वार्षिक 10 हजार भाडे असेल तर बँकेला 10 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल.

 

Web Title : Bank Locker Rules | bank news locker facility will be available even if the account is not in the bank as rbi changed the rules

 

हे देखील वाचा :

Ram Shinde | अनिल देशमुख यांच्या ठावठिकाण्याबाबत भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंचा खळबळजनक दावा; म्हणाले…

Murder in Pimpri | प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून चाकूने केले सपासप वार

Maharashtra Police | गृहमंत्र्यांच्या नावे 10 लाखांची खंडणी; 5 पोलिसांवर ‘FIR’ दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

 

Related Posts