IMPIMP

GST कौन्सिलने ‘या’ वस्तूंच्या दरात केला बदल, तपासून पहा संपूर्ण यादी

by nagesh
GST | taxpayers with turnover more than 2 crore file gstr 9 gstr 9c before 31 december

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था– GST | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी GST कौन्सिलच्या बैठकीनंतर अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली. यामध्ये कोरोना व्हायरसपासून बचावाच्या औषधांवर जीएसटीमधून सूट वाढवून 31 डिसेंबर 2021 केली. मात्र, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत त्यांनी म्हटले की, सध्या ती वेळ आलेली नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या वस्तूंच्या जीएसटी दरात झाला बदल

पुढील वर्षापर्यंत जहाज किंवा विमानाद्वारे एक्सपोर्ट गुड्सच्या ट्रान्सपोर्टेशनवर जीएसटी लागणार नाही. हा निर्णय यासाठी घेण्यात आला कारण एक्सपोर्टर्सला जीएसटी पोर्टलमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंड मिळण्यात अडचण येत आहे.

रेल्वे पार्ट आणि लोकोमोटिव्हवर जीएसटी 12% ने वाढवून 18% केला.

बायोडिझेलवर जीएसटी 12% ने कमी करून 5% केला.

दिव्यांग वापरत असलेल्या गाड्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या रेट्रो-फिटमेंट किट्सवर जीएसटी कमी करून 5% केला.

इंटीग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस स्कीममध्ये वापरल्या जाणार्‍या फोर्टीफाईड राईस केर्नल्स (Rice kernels) वर जीएसटी दर 18% वरून कमी करून 5% केला.

फार्मा डिपार्टमेंटप्रमाणे ज्या 7 औषधांची शिफारस करण्यात आली त्यांच्यावर 31 डिसेंबर 2021 पर्यंत जीएसटी दर 12% वरून कमी करून 5% केला आहे.

Keytruda सारख्या कॅन्सरच्या औषधांवर जीएसटी दर 12% वरून कमी करून 5% केला.

कोरोना व्हायरस संसर्गाच्या औषधांवर अगोदर जीएसटी सूट 30 सप्टेंबरपर्यंत होती. आता ती वाढवून 31 डिसेंबर 2021 केली आहे. मात्र, ही सूट केवळ औषधांवर असेल, मेडिकल उपकरणांवर नाही.

या औषधांवर 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागणार इतका GST Amphotericin B (0%)

Tocilizumab (0%)

Remdesivir (5%)

Heparin (5%)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : GST | gst rates changed in these items here is the full list of goods and services

 

हे देखील वाचा :

अलर्ट ! EPFO ने 6 कोटी PF खातेधारकांना पैशांबाबत जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा

Gold Silver Price Today | खुशखबर ! 8 महिन्यांतील सर्वात कमी दर ! सोनं 550 तर चांदीच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, जाणून घ्या

 

Related Posts